सरकार स्थापन होताच दोन तासांत जातीय जनगणनेची घोषणा : राहुल गांधींचे मोठे आश्वासन

सरकार स्थापन होताच दोन तासांत जातीय जनगणनेची घोषणा : राहुल गांधींचे मोठे आश्वासन

बस्तर : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने (Congress) विजय मिळविल्यास दोन तासांमध्ये जातीय जनगणनेची घोषणा करण्यात येईल. शिवाय छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास इथेही जातीय जनगणना करण्यात येईल, असे मोठे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (शनिवारी) दिले. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 2018 मध्ये राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने दिलेल्या तीन मोठ्या आश्वासनांचा उल्लेख केला. तसंच निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली होते, असेही त्यांनी सांगितले. (If the Congress wins the upcoming Lok Sabha elections, the caste census will be announced within two hours said rahul gandhi)

जातीय जनगणना, गरीब आणि मागासलेल्या लोकांऐवजी उद्योगपतींना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, “कोणतेही सरकार दोन प्रकारे काम करते. एक म्हणजे राज्यातील श्रीमंत लोकांना मदत करणे आणि दुसरे म्हणजे राज्यातील गरीब लोकांना मदत करणे. आम्ही गरीब, मजूर, शेतकरी, बेरोजगार, आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांना मदत करतो. काँग्रेस सरकार कल्याणकारी योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च करते. कारण आम्हाला माहित आहे की, गरीब आणि दुर्बल घटकांना मदत केल्याशिवाय हा देश उभा राहू शकत नाही किंवा प्रगती करू शकत नाही.”

Madhya Pradesh : नोकरी गेली अन् तिकीटही नाही! चौहान सरकारने केला उपजिल्हाधिकाऱ्याचा गेम

पण त्याचवेळी मोदी सरकार मोठे दावे करते आणि शेवटी अदानींना मदत करते. भूपेश बघेल यांनी म्हटल्याप्रमाणे अदानींना खाणी, विमानतळ, बंदरे दिली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कृषी कायदे करण्यात आले होते. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील सफरचंद उद्योग अदानींना देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिलेला पैसा बाजारात येतो, गावे आणि लहान शहरे समृद्ध होण्यास मदत होते. उद्योगपतींना दिलेला पैसा ते परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी खर्च करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.

Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं

ओबीसीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींचा निशाणा :

भाजपने एक नवीन गोष्ट सुरू केली आहे. मोदीजी जिथे जातात तिथे ते मागासवर्गीय आणि ओबीसींसाठी काम करत असल्याचे सांगतात. तुम्ही सर्वत्र ओबीसी हा शब्द वापरता, मग ओबीसीच्या जनगणनेला का घाबरता?तुम्ही तुमच्या भाषणात जातीय जनगणना हा शब्द का वापरत नाही? कारण ओबीसी लोकांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे हे तुम्हाला माहित आहे आणि हे ओबीसी तरुणांना कळू नये असे तुम्हाला वाटते. भारत सरकारचे सचिव म्हणून काम करणाऱ्या 90 आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त तीन ओबीसी आहेत. ते म्हणाले, हे 90 अधिकारी सरकार चालवतात, ते बजेट ठरवतात. त्यापैकी फक्त तीन ओबीसी आहेत, असा दावा यावेळी राहुल गांधी यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube