IIT च्या 7 हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच नाही; संस्थेने मागितली माजी विद्यार्थ्यांची मदत

IIT च्या 7 हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच नाही; संस्थेने मागितली माजी विद्यार्थ्यांची मदत

IIT Student has no placement institute asked for help to Alumni : आतापर्यंत आपण अनेक मोठ्या संस्था किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत नसल्याच्या बातम्या बघितल्या. मात्र आता थेट भारतीय प्रौद्योगिकी संस्था ( IIT ) म्हणजे आयटीच्या 2023-24 या वर्षाच्या तब्बल 38 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीच ( placement ) मिळालेली नाही. या संदर्भात आयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी आरटीआय कायद्याअंतर्गत माहिती मागितली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई : नारायणपूरच्या जंगलात सात नक्षलवादी ठार

यामध्ये आयआयटी दिल्लीचे जवळपास 400 विद्यार्थी तसेच आयआयटीच्या इतर सर्व कॅम्पसचे मिळून तब्बल सात हजार विद्यार्थी हे यावर्षी तसेच गेल्यावर्षी विना प्लेसमेंट राहिले आहेत. त्यासाठी आता आयआयटी दिल्ली आणि मुंबई त्याच बरोबर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ने 2023 24 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी आपल्या माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागितली आहे.

मोठी बातमी! पुणे पोर्श अपघात प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणार, आयुक्तांनी दिले आदेश

यासाठी आता आयआयटी दिल्लीने आपल्या माजी विद्यार्थ्यांना एक मेल केला आहे. ज्यामध्ये आयआयटीकडून आपल्या माजी विद्यार्थ्यांना मदत मागण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, आयआयटी दिल्ली 2023-24 च्या शैक्षणिक वर्षातील प्लेसमेंट ड्राईव्ह लवकरच संपेल.मात्र आम्ही सध्या अडचणीत सापडलो आहोत. आमच्या अथक प्रयत्नानंतर देखील जवळपास 400 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही. त्यासाठी आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क करत आहोत. त्यांच्याकडे आम्ही या संदर्भात मदत मागितली आहे. तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना या माजी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपची संधी द्यावी. असे देखील यामध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर या अगोदर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स यांनी देखील अशाच प्रकारची मदत मागितली होती.

चॅट जीपीटीमुळे प्लेसमेंट घटले…

दरम्यान यामागे एक कारण सांगितलं जात आहे. हे कारण म्हणजे चॅट जीपीटी आणि नव्याने विकसित करण्यात आलेले मोठे लँग्वेज मॉडेल्स. त्यामुळे कंपन्यांना कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम करून घेता येत आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळे सत्ता बदल त्यातून होणारे धोरणांचा बदल या सर्व गोष्टींची वाट पाहत असल्याने कंपन्यांकडून प्लेसमेंट करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज