कोटामध्ये एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी संपवल जीवन; लातूरच्या अविष्कार कासलेचे टोकाचे पाऊल

कोटामध्ये एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी संपवल जीवन; लातूरच्या अविष्कार कासलेचे टोकाचे पाऊल

Avishkar Kasale Suicide : राजस्थानच्या कोटा (kota) येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार अजूनही सुरू आहेत. अभ्यासाच्या दडपणाखाली घेतलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमधील परीक्षेवर बंदी घातली आहे. कोचिंग परीक्षेवर घातलेली ही बंदी तुर्तास  दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

कोटामध्ये देसभरातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. मात्र, काल एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली तर दुसऱ्याने गळफास लावून घेतला जीवनयात्रा संपवली आहे. पोलीस अधिकारी भागवतसिंग हिंगड यांनी सांगितले की, रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील आविष्कार संभाजी कासले या १६ वर्षीय तरुणाने कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आविष्कार हा कोटा येथील तलवंडी भागात ३ वर्षांपासून राहत होता. तो येथे NEET ची तयारी करत होता.

मोठी बातमी : वादग्रस्त IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी पुन्हा सेवेत; ठाकरे सरकारने केले होते निलंबित 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आविष्कारने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच कोचिंग क्लासच्या तिसऱ्या मजल्यावर परीक्षा दिली होती. कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आविष्कारसाठी रुग्णवाहिका बोलावली, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आविष्कारचा रस्त्यातच मृत्यू झाला.

आविष्कारचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबादमध्ये शिकतो. मोठ्या मुलाने कोटा येथून शिक्षण पूर्ण केलं होतं. त्याचं यश पाहून आविष्कारलाही कोटा इथं शिक्षणासाठी पाठवण्यातं आलं होतं.

आविष्कारच्या आत्महत्येनंतर आणखी एकाची आत्महत्या
कुन्हडी येथील लँडमार्क परिसरात राहणारा विद्यार्थी आदर्श (18) हा विद्यार्थी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आदर्श हा बिहारमधील रोहिताश्व जिल्ह्यातील रहिवासी होता. विद्यार्थी NEET च्या तयारीसाठी 4 महिने आधीच कोटा येथे आला होता. येथील लँडमार्क भागातील एका फ्लॅटमध्ये तो भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube