मोदी सरकारची 15 ऑगस्टच्या पाहुण्यांची यादी ठरली, आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी

मोदी सरकारची 15 ऑगस्टच्या पाहुण्यांची यादी ठरली, आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघे 6 ते 7 महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. याच तयारीचा भाग म्हणून केंद्रातील मोदी सरकारने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनच्या लाल किल्ल्यावरील विशेष कार्यक्रमात काही खास पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. देशभरातील तब्बल 1700 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. (Modi government has invited some special guests for a special event at the Red Fort on August 15 on Independence Day)

कोण आहेत प्रमुख पाहुणे?

मोदी सरकारकडून निमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यात जल जीवन मिशन, पीएम किसान सन्मान निधी योजना, अमृत सरोवर योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प यासारख्या विविध प्रमुख योजनांशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचे एका अधिकृत पत्रकातून सांगण्यात आले आहे.

अविश्वास प्रस्तावावर कोणाचं भाषण ठरलं सुपर?; सर्व्हेतून समोर आलं ‘या’ नेत्याचं नाव

या सोहळ्याचा भाग होण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना आमंत्रित करण्याचा उपक्रम सरकारने आपला लोकसहभाग वाढावा या दृष्टीकोनातून उचलला असल्याची माहिती या पत्रकातून देण्यात आली आहे. मात्र पडद्यामागे या निमंत्रिताच्या माध्य्ममातून योजनांचा प्रसार आणि प्रचार करणं, लाभार्थ्यांच्या माध्यमातून सरकारबद्दलची प्रतिमा तयार करणे हे उद्देश असल्याचे बोलले जाते.

निमंत्रितांमध्ये काही गावचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी ते मच्छीमार आणि केंद्राच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामात योगदान देणारे मजूर यांचा समावेश आहे. याशिवाय खादी क्षेत्रातील कामगार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कर्मचारी आणि विविध राज्यांतील अमृत सरोवर आणि हर घर जल योजना प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या लोकांनाही आमंत्रित केले आहे.

दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची सही, केजरीवालांचे अधिकाऱ्यांवरील नियंत्रण संपले

व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार सीमावर्ती भागातील गावांतील लोकांची जीवनशैली सुधारून त्यांना सक्षम बनविण्याचे काम करत आहे. दरम्यान, विशेष पाहुण्यांना नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि पंतप्रधान संग्रहालयाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube