अविश्वास प्रस्तावावर कोणाचं भाषण ठरलं सुपर?; सर्व्हेतून समोर आलं ‘या’ नेत्याचं नाव

अविश्वास प्रस्तावावर कोणाचं भाषण ठरलं सुपर?; सर्व्हेतून समोर आलं ‘या’ नेत्याचं नाव

NO Confidence Motion Survey : मणिपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. त्यांच्या या टीकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा नेत्या स्मृती इराणी आणि खुद्द पीएम मोदी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

मोदींनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात विरोधी नेत्यांनी सभागृहातून वॉक आऊट केल्यानंतर मणिपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने केलेल्या आरोपांना उत्तर दिली. आता याच मुद्द्यावर एक सर्व्हे करण्यात आला आहे. सी व्होटरने हा सर्व्हे केला असून अविश्वास प्रस्तावावेळी कोणाचे भाषण तुम्हाला आवडले असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला.

कोणत्या जिल्ह्यात कोणी झेंडा फडकवायाचा यावरुन नाराजी नाट्य; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

या प्रश्नांवर लोकांनीही हैराण करणारी उत्तरे दिली आहेत. या सर्व्हेत लोकांनी पीएम मोदींनाच सर्वाधिक मते दिली आहेत. दुसऱ्या नंबरवर काँग्रेस नेते राहुल गांधी असून त्यांच्याही भाषणाचे लोकांनी कौतुक केले. सर्व्हेत मोदींना सर्वाधिक 46 टक्के मते मिळाली. 22 टक्के लोकांनी सांगितले की राहुल गांधी यांचे भाषण प्रभावी होते. तर 14 टक्के लोकांनी अमित शाह यांच्या भाषणाला पसंती दिली. 9 टक्के लोकांना अन्य नेत्यांची भाषणे आवडली. तर 9 टक्के लोकांनी मात्र याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

अविश्वास प्रस्तावावेळी मोदींनी तब्बल सव्वा दोन तास भाषण केले. या भाषणात त्यांनी काँग्रेसचे राजकारणावर जोरदार प्रहार केले. तसेच अन्य विरोधी पक्षांवरही टीकेची तोफ डागली. विरोधकांना जरी आमच्यावर अविश्वास असला तरी देशातील जनतेला मात्र आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. आगामी काळातही जनता आमच्यावरच विश्वास दाखविल यात काहीच शंका नाही असे मोदी म्हणाले होते.

चर्चा मोदींविषयी नाही, मणिपूरविषयी होती, बोलतांना मोदींना भानच नव्हतं; राहुल गांधींची सडकून टीका

मणिपूरवर मोदींचे उत्तर लोकांना भावले

पंतप्रधानांनी संसदेत मणिपूरच्या मुद्द्यावर दिलेल्या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात का, असाही प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी मोदींच्या उत्तराने समाधानी असल्याचे सांगितले. या प्रश्नावर 51 टक्के लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले तर 38 टक्के लोकांनी ‘नाही’
म्हणत मोदींच्या भाषणावर असमाधान व्यक्त केले. 16 टक्के लोकांनी काही उत्तर दिले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube