India & Canada : कॅनडातील भारतीयांनी काय केलं पाहिजे? परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जाहीर…

India & Canada : कॅनडातील भारतीयांनी काय केलं पाहिजे? परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जाहीर…

India and Canada : खलिस्तानी दहशतवाद्यांकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडात असलेल्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. कॅनडात होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर ही अ‍ॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे.

भारत सरकारकडून कॅनडास्थित भारतीय नागिरकांसाठी अ‍ॅडव्हाझरी जाहीर केली असून भारतीयांनी कॅनडामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करु नयेत, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलं की, “कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे”.

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; लोकसभेत सोनिया गांधींकडून भूमिका स्पष्ट

तसेच कॅनडामधील जो भाग संवेदनशील आहे, अशा भागांत ज्या ठिकाणई भारतीय अधिकाऱ्यांना टार्गेट केलं गेलं आहे. त्या भागांत कॅनडास्थित भारतीयांनी संभाव्य प्रवास टाळण्याचा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतीयांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अ‍ॅडव्हायझरीचे पालन करणे आवश्यक आहे.

‘वाचाळवीरांवर कारवाई करा नाहीतर..,’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

खलिस्तानी संघटनांनी कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालय आणि त्यांच्या इतर कार्यालयांवर 25 सप्टेंबर रोजी हल्ला करण्याची धमकी दिली. त्यामुळे जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी ही एक परिक्षाच मानली जात आहे. भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेमध्ये कॅनडाकडून निष्काळजीपणा आढळल्यास भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते.

कॅनडा सरकारकडूनही अ‍ॅडव्हायझरी :
खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या सरकारने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. जस्टीन ट्रुडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील जम्मू काश्मीर या राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला या अ‍ॅडव्हाजरीत देण्यात आला आहे.सुरक्षेच्या कारणांमुळे कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. आ भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे, असे या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे. मात्र यामध्ये केंद्रशासित प्रदेश लद्दाखचा उल्लेख केलेला नाही. कॅनडाच्या नागरिकांनी इशान्य भारतातील मणिपूर, आसाम या राज्यांतही जाऊ नये असे कॅनडा सरकारने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube