India or Bharat : मोहन भागवत इंडिया ऐवजी भारत नावासाठी आग्रही, आता मात्र बोलणे टाळले

India or Bharat : मोहन भागवत इंडिया ऐवजी भारत नावासाठी आग्रही, आता मात्र बोलणे टाळले

India or Bharat : सध्या देशाच्या इंडिया आणि भारत (India or Bharat ) नावावरून गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India) नाव दिले आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. देशाचं नाव हे इंडिया नसून भारत आहे. असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्यात आणखी भऱ पडली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याने मात्र आता आपल्या त्याच वक्तव्यावर त्यांनी पुन्हा बोलणे टाळले असल्याचे पाहायाला मिळाले.

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ : लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल

काय म्हणाले होते मोहन भागवत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी 2 सप्टेंबरला देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत (India or Bharat ) वापरण्यात यावं असं म्हटलं होतं. लोकांनी तशी सवय करून घ्यावी. कारण भारत हे नाव प्राचीन काळापासून चालत आलं आहे. भाषा कोणतीही असो नाव एकच असतं. त्यामुळे व्यवहारांमध्ये देखील देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत वापरण्यात यावं. त्यामुळेच परिवर्तन होईल. आपल्याला आपल्या देशाला भारत म्हणावं लागेल आणि दुसऱ्यांनाही तो समजून सांगावं लागेल. असं वक्तव्य भागवतांनी केलं. ते सकल जैन समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.

INDIA च्या रणनीतीत मोठा बदल; पवारांच्या निवास्थानी ठरणार मास्टर प्लान

भागतांनी इंडिया आणि भारतवर बोलणे टाळले…

मात्र त्यानंतर आता एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या पुर्वी केलेल्या वक्तव्यावर आणि इंडिया आणि भारत (India or Bharat ) या मुद्द्यावर बोलणे टाळले असल्याचे पाहायला मिळाले आहे. भागवत हे नागपूरमध्ये ज्येष्ठ नागरीक विदर्भ या संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया आणि भारतच्या मुद्द्यावर

दरम्यान मोदी सरकारने ‘इंडिया’ शब्द कामकाजातून वगळला असून त्याजागी आता केवळ ‘भारत’ याच (India or Bharat ) नावाचा वापर सुरु केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला. राष्ट्रपती भवनातूनच याची सुरुवात झाली असून लवकरच संविधानातही दुरुस्ती होणार आहे. असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या G20 पाहुण्याच्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिले आहे, असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हंटले होते. त्यानंतर ते समोर देखील आले की, G20 च्या अधिकृत निमंत्रणावर ‘भारत’ असाच उल्लेख केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. तर स्वयंसेवक, माध्यमांच्या पत्रिकेव भारत आणि इंडिया असाही उल्लेख करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube