प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य सोहळा, काय काय कार्यक्रम होणार?
यंदा कर्तव्यपथावर एकूण 30 विविध चित्ररथ पाहायला मिळतील. त्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती आपल्याला दिसेल.
भारत 77 वा प्रजासत्ताक 26 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहानं आणि अभिमानानं (India) साजरा करणार आहे. ही महान परंपरा नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य परेड आणि विविध कार्यक्रमांच्या रूपात दिसून येईल. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन हा ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगाणला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्याचे स्मरण आणि भारताची एकता, विविधता आणि प्रगती हे मुख्य विषय घेऊन साजरा केला जाणार आहे.
या वर्षी 26 जानेवारीच्या परेडचे मुख्य अतिथी म्हणून युरोपियन संघटनेचे दोन प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले उर्सुला वॉन डेर लेयेन यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिन परेड सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवणे आणि वंदे मातरम् गीताच्या 150 वर्षांचा गौरव साजरा करून सुरू होईल. त्यानंतर 10.30 वाजता कर्तव्य पथावर मुख्य परेड सुरु होईल जी जवळपास दीड ते दोन तास चालेल.
मोठी बातमी! मध्य प्रदेशमध्ये हिंसाचार भडकला; अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना
यंदा कर्तव्यपथावर एकूण 30 विविध चित्ररथ पाहायला मिळतील. त्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती आपल्याला दिसेल. प्रत्येक चित्ररथाचं विषय “स्वतंत्रता का मंत्र : वंदे मातरम्” आणि “समृद्धि का मंत्र : आत्मनिर्भर भारत” असल्यामुळे भारताच्या इतिहासापासून आधुनिक प्रगतीपर्यंतचा प्रवास रंगून दिसेल. ऑपरेशन सिंदूर थीमवर आधारित चित्ररथ यंदा विशेष आकर्षण ठरेल, ज्यात भारतीय सैन्याची सामर्थ्य, राफेल आणि अन्य लढाऊ विमानांचे प्रतिनिधीत्व झळकताना दिसेल. विविध राज्यांची चित्ररथ त्यांच्या सांस्कृतिक वारसा, आर्थिक उत्कर्ष, पर्यटन व नवोन्मेष यांचे सान्निध्य दाखवतील.
सैन्य शक्तीचा अभिमान दाखवण्यासाठी भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल आपल्या सर्वोत्तम क्षमतेसह सहभागी होतील. या वर्षी विशेषतः वायुसेनेचे ‘सिंदूर’ फॉर्मेशन फ्लायपास्ट, ज्यात राफेल, सुखोई-30, मिग-29 असे लढाऊ विमान दिसतील. ते भारताचे सामर्थ्य दर्शवतील. पॅरेडमध्ये सुमारे 2,500 कलाकार विविध सांस्कृतिक कला सादर करताना दिसतील. त्यामध्ये पारंपरिक नृत्य, संगीत व विविध कला रूपे सामील आहेत. चित्ररथांसोबत देशाची विविध संस्कृती एकाच रांगेतून जगासमोर सादर केली जाईल.
