रामनवमीला इंदूरमध्ये मोठी दुर्घटना; छत कोसळून 50 पेक्षा जास्त लोक विहिरीत पडले

रामनवमीला इंदूरमध्ये मोठी दुर्घटना; छत कोसळून 50 पेक्षा जास्त लोक विहिरीत पडले

Indore : देशभरात आज रावनवमी उत्सवाची धूम असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मात्र एक दुर्घटना घडली आहे. शहरातील पटेल नगरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात असलेल्या विहीरीवरील छत खचल्याने 50 पेक्षा जास्त लोक या विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्या या लोकांना बाहेर काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.

घटना घडल्यानंतरही अग्निशम दल आणि अम्ब्यूलन्स वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे जसे जमेल तसे या लोकांना बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत पाच लोकांना विहीरीतून बाहेर काढले गेले आहे.

याठिकाणी आता पोलीस दल पोहोचले आहे. मंदिरातील अन्य लोकांना बाहेर जाण्यास सांगितले आहे. जे लोक या विहिरीत पडले आहेत त्यांची स्थिती आता कशी आहे याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही. विहीरीत दोर सोडून या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

‘पप्पू’ म्हणत ललित मोदींची एन्ट्री; राहुल गांधींना धमकी देत म्हणाले, आता मी…

 

मंदिरात होम हवन सुरू होते. त्यानंतर कन्या पूजन सुरू होते. याच दरम्यान मंदिरातील विहिरीवरील छत खचले आणि तेथे उपस्थित असलेले 50 पेक्षा जास्त लोक या विहिरीत जाऊन पडले. काय होतय हे कळायच्या आतच ही घटना घडल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले आणि काही जणांना बाहेर काढण्यात यश मिळवले.

Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

मंदिरात एक विहीर आहे. त्यावेळी मंदिरात होम झाला होता आणि लोक या विहिरीवर असलेल्या छतावर बसले होते. वजन वाढल्यामुळे अचानक हे छत कोसळले. काय होतय हे कळायच्या आत लोक आत पडले. रामनवमीमुळे आज मंदिरात जास्त गर्दी होती. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आतापर्यंत दहा लोकांना बाहेर काढले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube