अवधेश राय हत्याकांड प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा
Mukhtar Ansari Life Imprisonment : वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी, एमपी-एमएलए न्यायालयाने वाराणसीतील 32 वर्षे जुन्या खटल्याचा निकाल दिला आहे. अवधेश राय हत्याकांडात वाराणसी कोर्टाने सोमवारी हा निकाल दिला, त्यासोबतच कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
अवधेश राय खून प्रकरणात वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने सोमवारी मुख्तार अन्सारीला दोषी ठरवले. याप्रकरणी न्यायालयाने दुपारनंतर शिक्षा जाहीर केली. खून खटल्यातील दोषी मुख्तार अन्सारी याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने माजी आमदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या ३२ वर्षे जुन्या खटल्यात मुख्तार अन्सारीला आयपीसी ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Jailed gangster Mukhtar Ansari gets life imprisonment in Awadhesh Rai murder case
Read @ANI Story | https://t.co/RD7ILylfBM#MukhtarAnsari #AwadheshRai #Varanasi pic.twitter.com/NStD9hq8o8
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2023
Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…
अवधेश राय यांची ३ ऑगस्ट १९९१ रोजी हत्या झाली होती. तेव्हा अवधेश राज त्यांचा धाकटा भाऊ आणि सध्याचे काँग्रेस नेते अजय राय यांच्या घराबाहेर उभे होते. त्याचवेळी एक मारुती व्हॅन तेथे आली आणि अनेक लोक त्या व्हॅनमधून बाहेर पडले. त्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात एकचा आवाज झाला होता.
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
दरम्यान, न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी, दिवंगत अवधेश राय यांचे धाकटे बंधू आणि काँग्रेस नेते अजय राय म्हणाले की, “त्यांची 32 वर्षांची प्रतीक्षा आज संपत आहे आणि त्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे.” वाराणसीतील चेतगंज पोलीस स्टेशन हद्दीतील लहुराबीर परिसरात काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या करण्यात आली होती.