Rajasthan : अवघडंय राव.. काँग्रेसच्या राजस्थानातही 18 लाख बेरोजगार; सरकारनेच दिली माहिती

जयपूर : भाजप (BJP) सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) सरकार असलेल्या राज्यातही ही समस्या कायम आहे. काँग्रेसशासित राजस्थानात (Unemployment in Rajasthan) जवळपास 18.4 लाखांपेक्षा जास्त लोक बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने या बेरोजगारांची नोंदणी केली असून यापैकी 1 लाख 90 हजार पात्र उमेदवारांना सरकारकडू बेरोजगारी भत्ता मिळत आहे. याबाबत भाजप आमदार सतीश पुनिया (Satish Punia) यांनी प्रश्न विचारला होता.
मंगळवारी राजस्थान विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप आमदार सतीश पुनिया यांनी बेरोजगार उमेदवारांबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, राज्य सरकारने सांगितले की, 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 18,40,044 नोंदणीकृत बेरोजगार उमेदवार आहेत. ज्यात 11,22,090 पुरुष, 7,17,555 महिला आणि 399 इतर आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, कौशल्य, नियोजन आणि उद्योजकता संचालनालयाच्या पोर्टलवर राजस्थानमधील एकूण 18.4 लाखांहून अधिक बेरोजगारांची नोंदणी आहे. त्यापैकी 1.90 लाख पात्र उमेदवारांना बेरोजगारी भत्ता मिळत आहे.
राजस्थान सरकारचे मंत्री अशोक चंदना यांनी सांगितले की, 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत 6,22,043 उमेदवारांना लाभ मिळाला आहे. त्यापैकी 1,07,431 पुरुष आणि 83,442 महिलांसह 1,90,873 पात्र उमेदवारांना बेरोजगारी भत्ता दिला जात आहे.
अधिवेशनाआधीच उपमुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा ‘तो’ मुद्दा निकाली, म्हणाले, खराब प्रति
राजस्थान सरकारने सांगितले की, राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सहाय्य शिबिरेही आयोजित केली जात आहेत. जानेवारी 2019 ते जानेवारी 2023 या कालावधीत एकूण 1,062 रोजगार सहाय्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरांचा 1,08,890 युवकांनी लाभ घेतला.
यापैकी 87,173 उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे आणि 6,363 उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या संधी देण्यात आल्या. याशिवाय 15,354 उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.