कट्टर विरोधकाशी भाजपची हातमिळवणी! दोन पक्ष काँग्रेसला खिंडीत गाठणार
बंगळुरु : राज्याच्या हितासाठी कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जेडी(एस) आणि भाजपने एकत्र पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी बोलताना, जेडी(एस) नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सत्ताधारी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (JD(S) and bjp decided to work together with as an opposition in karnataka)
यावेळी कुमारस्वामी म्हणाले, आम्ही बेंगळुरू-म्हैसूर एनआयसीई (नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर एंटरप्रायझेस लिमिटेड) रस्त्यांच्या कामांसह सरकारच्या अनेक बेकायदेशीर कामांविरोधात अधिवेशनात चर्चेची विनंती केली होती, परंतु कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. तर जेडी(एस) सोबत नाईससह राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात लढणार आहेत, असा दावा बोम्मई यांनी केला. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकाही भाजपसोबत लढणार का? यावर आताच याबाबत बोलण घाईचं ठरले, कारण संसदीय निवडणुकांना वेळ आहे, असं कुमारस्वामी म्हणाले.
महिलांनीच दोन महिलांना मारहाण करत केलं विवस्त्र; स्मृती इराणींचा तृणमूलवर हल्लाबोल
कर्नाटकमध्ये मे महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 224 पैकी काँग्रेसला 135 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला 66 आणि जेडी(एस)ला 19 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सध्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे बहुमतातील सरकार सत्तेत आहे. याच सिद्धरामय्या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढण्यासाठी आणि राज्याच्या हितासाठी आपण भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळीही आमच्या पक्षाच्या आमदारांनी पुढे कसे जायचे यावर चर्चा केली, असा दावा कुमारस्वामी यांनी केला.
Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!
गुरुवारी रात्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात जेडी(एस) विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. यावेळी देवेगौडाही उपस्थित होते. याच बैठकीत भाजपसोबत एकत्रित जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पक्षाबाबतचे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला दिले आहेत. तसंच सर्व नेत्यांची मते एकत्रित करून पक्षसंघटनेसाठी आणि काँग्रेस सरकारच्या चुकीच्या कृत्यांविरोधात 31 जिल्ह्यांमध्ये आवाज उठवण्यासाठी सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व घेऊन 10 सदस्यांची टीम तयार करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे, असंही कुमारस्वामी यांनी माध्यमांना सांगितलं.