शेतकरी आंदोलनात हिंसाचार अन् रेप झाले, मृतदेह लटकवले गेले; कंगनाचे खळबजनक वक्तव्य

शेतकरी आंदोलनात हिंसाचार अन् रेप झाले, मृतदेह लटकवले गेले; कंगनाचे खळबजनक वक्तव्य

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडीच्या भाजप खासदार कंगना रणौ (Kangana Ranaut) सतत खळबळजनक वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers’ movement) मोठ्या प्रमाणात बलात्कार आणि हत्या झाल्या, केंद्राने कृषी कायदे मागे घेतले हे चांगलं झालं, अन्यथा पंजाबची अवस्था बांगलादेशसारखी (Bangladesh) झाली असती, असं वक्तव्य कंगनाने केलं.

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे, आदिती तटकरेंची मोठी घोषणा 

 

एका वृत्त वाहिनीला कंगनाने मुलाखत दिली. यावेळी बोलतांना कंगना अनेक विषयांवर भाष्य केलं. ती म्हणाले, आज आपले सर्वोच्च नेतृत्व कमकुवत असते तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतातही घडू शकली असती. इथल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय झालं ते सगळ्यांनी पाहिलंच आहे. शेतकरी आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणाच हिंसाचार झाला होता, तिथे बलात्कार होत होते, मृतदेह लटकवले जात होते. जेव्हा कृषी कायदे मागे घेतले नाही तर आंदोलकांचे मोठे नियोजन होते आणि ते देशात काहीही करू शकले असते. सरकारने हे विधेयक मागे घेताच या साऱ्यांना मोठा धक्का बसला, असंही कंगना म्हणाली.

सर्वात असंवेदनशील पंतप्रधान, संवेदना असती तर मोदी जळगावला आलेच नसते, कॉंग्रेसचे टीकास्त्र 

शेतकरी आंदोलनामागे देश अस्थिर करू पाहणाऱ्या काही लोकांचे मोठे षडयंत्र असल्याचेही कंगना म्हणाली. ती म्हणाले की, आंदोलकांनी देशाविरुद्ध विष पसरवण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी जोरदार टीका केली आहे. एक्सवर पोस्ट करत श्रीनेत यांनी लिहिलं की, भाजप खासदार कंगनाजी यांचे नवीन विधान असे आहे की, शेतकरी आंदोलनातही बांगलादेशआंदोलनसारखे मोठे नियोजन होते. यामागे चीन-अमेरिका यासारख्या परकीय ताकद होती. हे कंगनाजींचे वैयक्तीक मते आहे की, भाजप आणि सरकारचे मत आहे?, असा सवाल श्रीनेत यांनी केली.

कंगनाने कान पकडून माफी मागावी – कॉंग्रेस
श्रीनेत पुढे म्हणाल्या की, भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांना खूप शिव्या दिल्या, आता त्यांचे खासदारही शेतकऱ्यांना मारेकरी आणि बलात्कारी म्हणत आहेत. याचे उत्तर आम्ही देणार नाही, हरियाणा काही दिवसांतच उत्तर देईल. मात्र राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले गेले असतील तर भाजप आणि सरकारला उत्तर द्यावे लागेल. तसे नसेल तर या खासदाराने कान पकडून माफी मागावी, असी मागणी त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube