‘त्या’ सर्व्हेने उडाली काँग्रेसची झोप! भाजपला मिळाला बूस्टर डोस..

‘त्या’ सर्व्हेने उडाली काँग्रेसची झोप! भाजपला मिळाला बूस्टर डोस..

Karnataka Elections : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Elections) येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या निवडणुकीत आता अनपेक्षितपणे बजरंग बलींची एन्ट्री झाली आहे. खरे तर ही एन्ट्री काँग्रेसनेच (Congress) करून दिली आहे. मग काय भाजपने (BJP) हा मुद्दा हातोहात उचलत जोरदार प्रचार सुरू केला आहे.

आता तर हा प्रचार इथपर्यंत येऊन ठेपला आहे की थेट पंतप्रधान मोदींनीही बजरंग बलींचे नाव घेत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. तर दुसरीकडे आपले काहीतरी बिघडलेच याचा अंदाज आल्याने काँग्रेसनेही दोन पावले मागे येत डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. काँग्रेसने आता राज्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिर उभारण्याची नवी घोषणा केली आहे.

Karnataka Elections : ‘त्या’ भूमिकेवरून काँग्रेसचा युटर्न, दिलं थेट भगवान हनुमानाचे मंदीरं बांधण्याचं आश्वासन

याच मुद्द्यावर आता सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी कर्नाटकात एक सर्व्हे केला. या सर्व्हेतून जे निष्कर्ष समोर आल आहेत त्यामुळे काँग्रेसची झोप नक्कीच उडणार आहे. या सर्व्हेत बजरंग दल वादाबाबत लोकांची काय मते आहेत हे जाणून घेण्यात आले. बजरंग दलावर बंदी घालणे योग्य आहे की अयोग्य ?, असे काही प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेत जवळपास 8 हजार 272 लोकांनी सहभाग घेतला.

बजरंग दलाची देशात प्रतिबंधित असलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेशी तुलना करणे बरोबर आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 35 टक्के लोकांनी ही तुलना योग्य असल्याचे म्हटले. तर 38 टक्के लोकांनी बजरंग दलाची तुलना पीएफआयबरोबर करणे योग्य नाही, असे म्हटले. 27 टक्के लोकांना मात्र याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले.

मणिपूर हिंसाचार ! दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

दरम्यान, आतापर्यंत राज्यात फ्रंटफूटवर असणारी काँग्रेस या एकाच मुद्द्यामुळे बॅकफूटवर ढकलली गेली आहे. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी काँग्रेसचे सरकार आल्यावर ठिकठिकाणी हनुमान मंदिर बांधणार असल्याचे सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube