माजी पंतप्रधानांची तिसरी पिढी रिंगणात; कोण आहेत पार्ट टाइम नेता निखील कुमारस्वामी ?

माजी पंतप्रधानांची तिसरी पिढी रिंगणात; कोण आहेत पार्ट टाइम नेता निखील कुमारस्वामी ?

Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपने सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे काँग्रेसही जोरदार टक्कर देताना दिसत आहे. मात्र कर्नाटक निवडणुकीत यंदा घराणेशाहीचेही राजकारण पहायला मिळत आहे.

जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांची तिसरी पिढी रिंगणात आहे. माजी पंतप्रधान आणि जीडीएस प्रमुख देवेगौडा यांनी त्यांचा नातू निखिलला एबी फॉर्म दिला आहे. त्यांनी नातवाला आशीर्वाद दिला. निखिल कुमारस्वामी (Nikhil Kumar Swamy) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी हे रामनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राजकारणात सक्रिय असणारी निखिल ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीतील आहेत. माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (H. D. Kumar Swamy) यांच्या मुलाला जेडीएसने रामनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवरील विद्यमान आमदार अनिता कुमारस्वामी आहेत त्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

निखिल कुमार स्वामी हे व्यवसायाने अभिनेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते. मंड्या लोकसभा मतदारसंघातून आधी अभिनेत्री असलेल्या सुमलता अंबरीश यांनी त्यांचा सव्वा लाख मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर निखिल त्यांच्या चित्रपट जीवनात सक्रिय झाले होते. परंतु, कुटुंबाने त्यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. कर्नाटकचे रामनगर विधानसभा जागा जेडीएससाठी खूप महत्त्वाची आहे.

रामनगर ही 2004 पासून जेडीएसकडेच आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी चार वेळा येथून विजयी झाले आहेत. 2004, 2008, 2013, आणि 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. देवेगवडा यांनी याआधी 1994 मध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र नंतर कुमारस्वामी यांच्या पत्नीने पोटनिवडणुकीत ही जागा जिंकली. यावेळी जेडीएसने या जागेवरून कुमार स्वामी यांचा मुलगा निखिल याला उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दोन लाख 6 हजार 999 मतदार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube