निपाह व्हायरसचा धोका वाढला, केरळमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नातेवाईकांना निगराणीत ठेवले…
Kerala Nipah Virus : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची (Nipah Virus) लागण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा रविवारी कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. यानंतर केरळमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (Veena George) यांनी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार; मुंबईत अमित शाह यांचा हल्लाबोल
मृत मुलाच्या तपासणीचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी संस्थेत पाठविण्यात आले होते. सदर मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे संस्थेने सांगितल्यानंतर त्याची रवानगी कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आली होती. मुलावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले मोनोक्लोनल अँटीबॉडी पुण्याहून कोझिकोडला पाठवण्यात आले. मात्र त्यापूर्वीच रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
“डोकं धरून बसू नका, विधानसभेत कसर भरून काढा”; अमित शाहांचं कार्यकर्त्यांना टॉनिक
राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, निपा विषाणूमुळे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाला १० दिवसांपासून ताप होता. पीडित मुलाला सकाळी 10.50 वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र सकाळी 11.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. प्रोटोकॉलनुसार, संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसांच्या आत मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या जातात. या प्रकरणात बाधित मुलाला अँटीबॉडीज देण्यास विलंब झाल्याची माहिती वीणा यांनी दिली.
मुलाचे अंतिम संस्कार आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केले जातील, असेही वीणा यांनी सांगितले. यासाठी मुलाचे कुटुंबीय आणि पालकांशी बोलणी सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या तीन नातेवाईकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचं वीणा यांनी सांगितलं.
केरळमध्ये 2018 पासून पाचव्यांदा निपाह संसर्ग पसरला आहे. यापूर्वी 2019, 2021 आणि 2023 मध्येही त्याची प्रकरणे आढळून आली होती. यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित केलेली नाही.
निपाह विषाणू काय आहे?
निपाह हा विषाणूजन्य संसर्ग आहे. जो प्रामुख्याने वटवाघुळ, डुक्कर, कुत्रे आणि घोडा या प्राण्यांवर प्रभावित करतो. हा जुनोटिक प्रकारचा विषाणू असल्याने, तो संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या मानवांना देखील संक्रमित करू शकतो. यानंतर तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.
निपाहची लक्षणे काय?
तीव्र ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होण, खोकला, अतिसार, उलट्या होणे, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणवणे ही निपाह व्हायरसची लक्षणे आहेत.