लालूंना किडनी देवून जीवदान देणाऱ्या मुलीने सोडलं राजकारण अन् तोडलं कुटुंबाशी नातं

दोन्ही सोडण्याचा निर्णय जाहीर करत असल्याचं सांगितलं आहे. रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत ही घोषणा केली.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 15T153408.881

बिहार विधानसभेचे निकाल काल लागले. त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा (RJD) दारूण पराभव झाला. त्यानंतर आता लालूंच्या कुटुंबातून मोठी बातमी समोर आली आहे. लालू यादव यांची मुलगी रोहिणी अयार्य यांनी मी राजकारण आणि कुटुंब दोन्ही सोडण्याचा निर्णय जाहीर करत असल्याचं सांगितलं आहे. रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत ही घोषणा केली.

रोहिणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय यादव आणि रमीज यांनी असं करण्यास प्रवृत्त केल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर सर्व दोष मी स्वतःवर घेतं आहे.

तेज प्रताप अगोदरच बाहेर

राजदमधील कुटुंबातील वाद काही नवीन नाहीत. परंतु निवडणुकीतील पराभवानंतरच्या घटनांमध्ये वेगाने होणारी उलथापालथ पक्षाच्या अंतर्गत कमकुवतपणा उघडकीस आणत आहे. लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांनी आधीच पक्ष आणि कुटुंब सोडले आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आरजेडीविरुद्ध निवडणूक लढवून आपला बंडखोर दृष्टिकोन उघडपणे दाखवला. आता, रोहिणी आचार्य यांच्या निर्णयामुळे लालू कुटुंबाच्या ऐक्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

follow us