Lionel Messi In India : PM मोदी अन् मेस्सीची भेट हुकली; नेमकं कारण काय?

फुटबॉलचा बादशाहा लियोनेल मेस्सी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत होणारी भेट हुकलीयं. दिल्लीतल्या दाट धुक्क्यामुळे ही भेट टळल्याचं सांगितलं जातंय.

Untitle

Lionel Messi In India : नियोजित दौऱ्यानुसार फुटबॉलचा बादशाहा लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत होणारी भेट टळलीयं. दिल्लीत दाट धुक्क्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीयं. त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि भाजपचे नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन व भारत दौऱ्यावर असलेल्या मेस्सी यांना बसलायं. दाट धुक्क्यामुळे मोदी आणि मेस्सी यांची भेट हुकलीयं.

मेस्सी दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर निघाले आहेत. त्यामुळे आता दोघांचीही भेट होणार नसल्याचं समोर आलंय. फुटबॉल जगतातील बादशाह लियोनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. अर्जेटिना संघाचा माजी कर्णधार लियोनेल मेस्सी आज राजधानी दिल्लीत असणार आहे. यावेळी मेस्सीच्या स्वागतासाठी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलायं.

पाठमोरी दिसणारी सासू-सुनेची जोडी नेमकी कोण? अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ च्या टीझर आणली धमाल

दिल्लीतील लिला पॅलेस हॉटेलमध्ये मेस्सी आणि त्यांची संपूर्ण टीम राहणार असून या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिला पॅलेस हॉटेल मेस्सी आणि टीमसाठीच बुक केला असून दिल्लीत विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा संपूर्ण दिवस विशेष मुलाखती आणि हाय प्रोफाईल कार्यक्रमांनी आयोजित असणार आहे.

पाठमोरी दिसणारी सासू-सुनेची जोडी नेमकी कोण? अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ च्या टीझर आणली धमाल

नियोजित वेळेनुसार आज सकाळी 11 च्या सुमारास लियोनेल मेस्सी दिल्लीत दाखल होणार होता. त्यानंतर विमानतळावरुन हॉटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार होती, मात्र त्यांची भेट झाली नाही. दिल्लीत असेलल्या दाट धुक्क्यामुळे त्यांची ही भेट टळली असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश काही खासदरांसह अर्जेटिना टीम आणि मेस्सीशी संवाद साधणार होते. यामध्ये ऑलिम्पिंकपट्टू, क्रिकेकपट्टू यांचा समावेश होता.

follow us