Budget 2026 LIVE : इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे; अपघात विम्यातून मिळालेली रक्कम आता करमुक्त

निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 01T105139.148

Union Budget 2026 Live Updates : संसदेत आज (दि.1) देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या असून, इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नसल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म अधिक सोपा केला जाणार असून १ एप्रिल २०२६ पासून नवा उत्पन्नकर कायदा लागू होणार आहे. नव्या कायद्यानुसार तांत्रिक त्रुटींसाठी शिक्षा न देता दंड आकारला जाणार आहे. लहान कर उल्लंघनांमध्ये केवळ दंड आकारला जाणार आहे. तर, परदेश प्रवासावर आकारला जाणारा कर कमी करण्यात आला आहे. परदेश प्रवासासाठी TCS दर ५ टक्के कर आकारला जाणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Feb 2026 12:15 PM (IST)

    कर चुकवणाऱ्यांना आता शिक्षा नाही, फक्त दंड: अर्थमंत्री

    आयकर विवरणपत्रे उघड करण्यासाठी आता कोणतीही शिक्षा नसेल मात्र, यासाठी सरकारने दंडची रक्कम जाहीर केली आहे. किरकोळ उत्पन्न लपवणाऱ्यांकडून ३० टक्के कर आकारला जाईल.

  • 01 Feb 2026 12:02 PM (IST)

    आयकर कायदे आणि कर संकलनाशी संबंधित अनेक प्रमुख घोषणा

    नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार

    Non‑debt receipts: ₹36.5 लाख कोटी

    Net tax receipts: ₹28.7 लाख कोटी

    कर्जाव्यतिरिक्त प्राप्ती: ₹३६.५ लाख कोटी

    निव्वळ कर प्राप्ती: ₹२८.७ लाख कोटी

    शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टीसीएस दर ५% वरून २% पर्यंत कमी केला

    सुधारित विवरणपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली. नाममात्र शुल्क आकारून सुधारित विवरणपत्रे दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल.

    आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत

    आयटीआर-१ आणि आयटीआर-२ दाखल करणारे ३१ जुलैपर्यंत दाखल करू शकतील.

    नॉन-ऑडिट व्यवसाय प्रकरणे आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असेल.

    मालमत्ता विकणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी टीडीएस नियम बदलले

    आता निवासी खरेदीदाराकडून टीडीएस कापला जाईल.

    पूर्वी TAN आवश्यक होते, आता ते आवश्यक राहणार नाही.

    मोटार अपघात दाव्यांवर आता व्याज लागणार नाही

    परदेशी प्रवासावरील कर कमी करण्यात आला असून, परदेशी प्रवासासाठी टीसीएस दर ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

  • 01 Feb 2026 11:57 AM (IST)

    परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा वाढवली

    परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा ५% वरून १०% पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी प्रोआयना परवानगी. प्रोआयना गुंतवणूक मर्यादा १०% वरून २४% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

  • 01 Feb 2026 11:52 AM (IST)

    खादी आणि हातमागाला बळकटी देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मी मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडत आहे. खादी आणि हातमागाला बळकटी देण्यासाठी मी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचे सीतारमण यांनी यावेळी सांगितले.

  • 01 Feb 2026 11:50 AM (IST)

    अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला काय मिळालं?

    प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षणासाठी मुलींची वसतिगृह उभारणार

    मुंबईत एबीजीसीची कंटेट क्रिएटिव्ह लॅब

    पशुवैद्यकीय आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य

    डिझाईन क्षेत्राला चालना

    सरकारने एआय मिशन, R&D प्रकल्प हाती घेतले आहेत

    तरुणांसाठी आरोग्य संस्थेत आम्ही काही तंत्रज्ञानात भर घालणार आहोत.

  • 01 Feb 2026 11:47 AM (IST)

    पर्यटनाला बळ देण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या घोषणा

    खगोलशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी 20 महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळी १० हजार गाईडना प्रशिक्षण दिले जाणार  त्याशिवाय कंटेंट क्रिएटर लॅबची स्थापना केली जाईल.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटलिटीची घोषणा, नॅशनस डेस्टिनेशन नॉलेज ग्रिडवर सर्व पर्यटन स्थळांचे मॅपिंग केले जाणार असून, नोकऱ्या, कंटेट क्रिएटर्स यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

  • 01 Feb 2026 11:44 AM (IST)

    शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांच्या घोषणा

    पूर्व भारतमध्ये नवे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन सुरू करणार
    पाच विद्यापीठ टाउनशिप उभारणार
    उद्योग कॉरिडोरच्या जवळ उभारणी होणार
    प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन
    पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचे बळकटीकरण
    15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार
    Animation, Gaming उद्योगाला बळ देण्यासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा

    १५ हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार आहेत.

  • 01 Feb 2026 11:43 AM (IST)

    कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज तंत्रज्ञानामध्ये पुढील ५ वर्षांत २०,००० कोटींची तरतूद

    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (CCUS) तंत्रज्ञानामध्ये पुढील ५ वर्षांत २०,००० कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मांडला आहे, जेणेकरून अंतिम-वापर अनुप्रयोगांमध्ये या तंत्रज्ञानाचा विस्तार करता येईल आणि उच्च सज्जता पातळी गाठता येईल.

  • 01 Feb 2026 11:42 AM (IST)

    गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुवैदिक केंद्र उभारणार

    गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुवैदिक केंद्र उभारणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.

  • 01 Feb 2026 11:38 AM (IST)

    वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब

    वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी ५ प्रादेशिक हब -. पीपीपी तत्त्वावर मेडिकल टुरिझम हब, वैद्यकीय, संशोधनाला प्रोत्साहन, आयुष् केंद्रे, करिअरची संधी, आरोग्यसेवांची उपलब्धता याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात ३ नवीन अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थांची (एम्स) स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

  • 01 Feb 2026 11:35 AM (IST)

    अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

     सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी

     भारताला औषध निर्मितीचे हब बनवू,

     बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद

     शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त

     7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर

     मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर

     20 नवे जलमार्ग बनवणार

     बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती

  • 01 Feb 2026 11:34 AM (IST)

    पुणे, मुंबईबद्दल अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा…

    पुणे, मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे. मुंबई ते पुणे, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते वाराणसी यासह सात हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत.

  • 01 Feb 2026 11:32 AM (IST)

    आत्मनिर्भर भारतासाठी सरकारने तिजोरी उघडली

    सरकारने आत्मनिर्भर भारतासाठी तिजोरी उघडली असून अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी यासाठी २००० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आल्या आहेत. यात टियर २ आणि टियर ३ शहरे विकसित केली जातील. ५,००,००० किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे विकसित केली जातील.

  • 01 Feb 2026 11:24 AM (IST)

    FM Nirmala Sitharaman : ओडिसा आणि केरळबद्दल निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा..

    खनिज कॉरिडोअर आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळला होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

  • 01 Feb 2026 11:24 AM (IST)

    Union Budget 2026 : कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे होणार स्वस्त…

    कॅन्सर आणि मधुमेहाची आैषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

  • 01 Feb 2026 11:23 AM (IST)

    भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले…

    भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले असून भविष्यात याबाबत निर्णय घेतली जातील.

  • 01 Feb 2026 11:23 AM (IST)

    गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू- निर्मला सीतारामण

    गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत, असे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केली आहे. आर्थिक विकासदरात वाढ हे आमचे पहिले मोठे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.

  • 01 Feb 2026 11:23 AM (IST)

    उत्पादन वाढवण्यावर आमचा भर…

    देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर आमचा भर असल्याचे मोठे विधान निर्मला सीतारामण यांनी केले आहे.

  • 01 Feb 2026 11:23 AM (IST)

    आत्मनिर्भर भारत हे सरकारचे प्रमुख लक्ष्य- निर्मला सीतारामण

    अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांनी म्हटले की, आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य आहे.

  • 01 Feb 2026 11:22 AM (IST)

    अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्पाचे वाचन सुरू

    अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. या अर्थसंकल्पाकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.

  • 01 Feb 2026 11:22 AM (IST)

    अर्थसंकल्पावर नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मोठे विधान..

    नुकताच अर्थसंकल्पाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विकसीत भारताचा अर्थसंकल्प असणार आहे.

follow us