Lok Sabha Election : दक्षिण भारतात घमासान! भाजपसाठी टफ, काँग्रेसलाही वाट खडतर..

Lok Sabha Election :  दक्षिण भारतात घमासान! भाजपसाठी टफ, काँग्रेसलाही वाट खडतर..

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. या निवडणुकीत भाजपला 370 जागांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारत जास्त महत्वाचा आहे. उत्तर भारतात भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janata Party) स्ट्राँग आहे. पण याच उत्तर भारतात काँग्रेसची स्थिती (Congress Party) अत्यंत बिकट झाली आहे. या निवडणुकीत हिंदी पट्ट्यात काँग्रेसला मोठे यश मिळेल अशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपला मोर्चा दक्षिण भारताकडे (South India) वळवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सातत्याने दक्षिण भारताचे दौरे करत आहेत. येथील मंदिरांना भेटी देत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा वायनाड मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे तर तामिळनाडू मध्ये (Tamil Nadu) काँग्रेस द्रमुकबरोबर सत्तेत आहे. भाजपकडे मात्र यातील काहीच नाही. केंद्रातील सरकारचे दहा वर्षांचं रिपोर्ट कार्ड आणि मोदी मॅजिक या दोन गोष्टींवरच भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

‘यूपी’, ‘तेलंगणा’नंतर MP! लोकसभेच्या रिंगणात ‘बसपा’; मध्य प्रदेशात उमेदवार देणार

राजकारणात दक्षिण भारताचे महत्व असं समजून घेता येईल. ज्यावेळी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पाटण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांच्या परिवरावरून त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी मोदींनी हैदराबादची निवड केली. मागील दोन महिन्यांच्या काळात पीएम मोदींनी दक्षिणेकडील राज्यांचा सहापेक्षा जास्त वेळेस दौरा केला.

राहुल गांधीचे पुन्हा ‘वायनाड’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) पहिल्या टप्प्याची सुरुवात दक्षिण भारतातूनच केली होती. आता लोकसभेत राहुल गांधी आणि शशी थरूर हे दोन दिग्गज नेते दक्षिण भारतातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार यंदा काँग्रेसला दक्षिण भारतातील वाटचाल खडतर आहे. मागील निवडणुकीत राहुल गांधींनी अमेठी व्यतिरिक्त केरळ राज्यातील वायनाडमधूनही उमेदवारी केली होती. उत्तरेतील खराब स्थितीला दक्षिणेतून आधार मिळेल असा विचार त्यावेळी होता. या रणनीतीचा फायदाही झाला. केरळमधील 20 पैकी 15 जागा काँग्रेसने जिंकल्या.

‘इंडिया’ला मोठा झटका, काँग्रेस केवळ 37 जागा जिंकणार, काय सांगतो 543 जागांचा सर्व्हे?

‘तमिळ संगमम’ आणि ‘सेंगोल’

मागील निवडणुकीत भाजपला दक्षिण भारतात फक्त 29 जागा जिंकता आल्या होत्या. यामध्ये कर्नाटकातील 25 आणि तेलंगणातील चार जागांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य राज्यांत भाजपची पाटी कोरीच राहिली. याचा दुसरा अर्थ असा की या राज्यांतील 101 जागा भाजपाला जिंकता आल्या नाहीत. आता याच गोष्टीवर भाजपने फोकस केला आहे. बनारस तमिळ संगमम कार्यक्रमामुळे वातावरण निर्मिती करता आली. नवीन संसद भवनात सेंगोल स्थापित करून यामध्ये आणखी भर टाकण्यात आली.

दक्षिणेतील सर्वात मोठे राज्य तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. कर्नाटकात 28, केरळमध्ये 20 आणि पुदुचेरीत एक अशा दक्षिण भारतातील एकूण 130 जागा सत्ता मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. 2004 च्या निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला हटवून काँग्रेसचे सरकार आणण्यात या राज्यांचे मोठे योगदान होते. या निवडणुकीत यूपीएला तेलंगणासह संयुक्त आंध्र प्रदेश आणि तामिनाडू या राज्यांतील 81 पैकी 68 जागांवर विजय मिळाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube