MP Election 2023 : सर्व्हे आला, धोका दिसला भाजपने थेट प्लॅनच बदलला

MP Election 2023 : सर्व्हे आला, धोका दिसला भाजपने थेट प्लॅनच बदलला

MP Election 2023 : मध्य प्रदेशात याच वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका (MP Election 2023) अटीतटीच्या होतील अशीच चिन्हे दिसत आहेत. मात्र कोण बाजी मारणार याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजप कोणतीही चूक करण्यास तयार नाही. त्यामुळेच यंदाही भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच प्रोजेक्ट करण्याचे जवळपास नक्की केले आहे. राज्यात भाजप दोन दशकांपासून सत्तेत आहे. मधले सव्वा वर्ष काँग्रेसचे सरकार होते. बराच काळापासून सत्तेत असल्याने आता भाजपला सत्ताविरोधी वातावरणाची चिंता सतावू लागली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी केलेला पक्षांतर्गत सर्व्हेही ठोके वाढविणाराच आला आहे. त्यानंतर पक्ष सध्या अशा रणनितीवर काम करत आहे ज्यामुळे अँटी इन्कम्बसीचा प्रभाव रोखता येईल तर दुसरीकडे प्रधानमंत्र्यांचा चेहरा पुढे करून मतदारांना आकर्षित करता येईल. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचा राज्यात हस्तक्षेप वाढला आहे. संपर्क अभियानांतर्गत नेतेमंडळी लोकसभा विधानसभा मतदारसंघांसह नागरिकांशीही संवाद साधत आहेत.

BJP : मोदींची सभा भोवणार? भाजपच्या दोघांची आमदारकी धोक्यात

या रणनितीमागे खरा उद्देश स्थानिक पातळीवरील परिस्थितीची माहिती करून घेणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे असा आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही राज्यातील दौरे वाढले आहेत.

मोदी 27 जून रोजी मध्य प्रदेशात येत आहेत. धार आणि भोपाळ येथील कार्यक्रमांना ते हजेरी लावतील. त्यानंतर शहडोल येथेही जाण्याची शक्यता आहे. आदिवासी मतदारांना आकर्षित करण्याचाही प्लॅन भाजपने तयार केला आहे. आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने मोदी राज्यात आले होते. आदिवासी बहुल प्रदेश शहडोल येथेही मोदी जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; रस्ता वाहून गेला, लष्कराने 3500 पर्यटकांना वाचवलं…

जिथं नुकसान झालं, तिथं बदलला प्लॅन 

राज्यातील आदिवासी व्होट बँकेवर भाजपची नजर आहे. सन 2018 च्या निवडणुकीत भाजपला आदिवासी प्रदेशात मोठे नुकसान सहन करावे लागले होते. 47 जागांपैकी फक्त 16 जागा जिंकण्यात पक्षाला यश आले होते. काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर होता. एकूणच भाजपला सत्ताधीश होण्यापासून रोखण्यात आदिवासी मतांचे महत्वाचे योगदान राहिले होते. त्यामुळेच भाजप पुन्हा एकदा या व्होट बँकेला आकर्षित करण्यासाठी काम करत आहे. मागील निवडणुकीत राज्यातील 230 जागांपैकी काँग्रेसला 114 तर भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या.

राज्य सरकारच्या दृष्टीने भाजपचा अभिप्राय चांगला नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा चेहरा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीत उतरावे असा पक्षाचा विचार आहे. या कारणांमुळेच पंतप्रधान मोदींचे राज्यातील दौरे वाढले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube