Mahatma Gandhi Jayanti 2024 : आज (दि. 2 ऑक्टोबर) महात्मा गांधींची जयंती. महात्मा गांधी हे भारतीय इतिहासातील असं व्यक्तिमत्व होते ज्यांनी कधीही कोणतेही पद भूषवलं नाही. परंतु, जगाने त्यांना महात्मा ही उपादी दिली. जगाला अहिंसेचा धडा शिकवणारे बापू तत्त्वांचं पालन करणारे होते. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपर्यंत प्रत्येक घटनेत महात्मा गांधींचा मोठा वाटा राहीला. आज बापूंच्या जयंतीनिमित्त राजघाटावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन केलं.
विवेकाची वाट चालत राहिले
विज्ञानात असलेला मानव सामाजिक शास्त्रात माणूस होतो. मानवाचं माणसात रूपांतर होण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. जीवन प्रवासात मानवाचा माणूस होण्यासाठी चालावी लागणारी पाऊलवाट म्हणावी तितकी सोपी नाही. पराकोटीचा त्याग, सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा आणि सामाजिक जाणिवांच्या उंचीवर सतत उभे राहावे लागते. चांगले विचार सांगून चालत नाही तर त्या वाटेवर चालण्याचा अखंड प्रवास महत्त्वाचा ठरतो. जीवनभर विचारांशी बांधिलकी स्वीकारत विवेकाची वाट चालत राहणारी माणसं मोठी असतात.
Rahul Gandhi: हे मोदी अन् भाजप सरकार नसून अदानी अन् अंबानी सरकार; राहुल गांधींचा घणाघात
महात्मा गांधी यांचं संपूर्ण जीवन म्हणजे माणूसपणाच्या उंचीवरचा प्रवास होता. गांधीजींना कोणी महात्मा म्हणते, कोणी राष्ट्रपिता, त्यांच्या विचारावरील निष्ठेपोटी काहींनी प्रेमत्वाने देवत्व बहाल केलं, पण गांधी नावाचा माणूसच होता. त्यांच्यात माणूसपणाच्या संवेदना इतक्या ठासून भरल्या होत्या की हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला असेल यावर भविष्यकाळ विश्वास ठेवणार नाही, हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचे शब्द आजही तंतोतंत खरे ठरतात.
लाखावर पुस्तके लिहिली
आजही असा माणूस भारतात जन्माला आला होता यावर वर्तमानही विश्वास ठेवत नाही. एकाच वेळी प्रचंड लोकप्रियता आणि त्याचवेळी त्यांच्या विचारांचे शत्रूही, पण तरीही या माणसाचा अखंड जीवन प्रवास माणूसपणाचाच होता. कारण एखाद्या माणसावर लाखावर पुस्तके लिहिली जावीत हे त्यांच्या माणूसपणाची उंची अधोरेखित करणारे नाही का? गांधी न समजून घेतल्याने गांधीजींचे कोणतेही नुकसान नाही. मात्र, त्यामुळे समजून न घेणार्यांचे मात्र नुकसान झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं.
गांधीजींच्या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले. मात्र, त्यांनी कधीच त्या संघर्षाला हिंसेने उत्तरे देण्यासाठी हात उगारले नाहीत किंबहुना तसा विचारही मनात डोकावला नाही. त्यांनी अखंड जीवनभर सातत्याने अहिंसेची पाऊलवाट चालणं पसंत केलं. जेव्हा स्वत:ला जिवंत मारण्यासाठी माणसं आली होती. तरीही हा माणूस आपल्या तत्त्वांवर निस्सीम प्रेम करीत राहिला. त्यांनी त्या मारेकर्यालादेखील माफ केलं ही त्यांनी शिकवण घेऊन आजही हा भारत देश चालू पाहतो ही खरी आदरांजली.