पक्षासाठी नडला, लढला… पण आता विचारपूसही नाही; मरणासन्न आमदाराचाच भाजपला विसर!

पक्षासाठी नडला, लढला… पण आता विचारपूसही नाही; मरणासन्न आमदाराचाच भाजपला विसर!

दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराची आग 4 ते 5 महिन्यानंतरही धगधगत आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. कधी महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तर कधी स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळल्याच्या बातम्या समोर आल्या. यात आता आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री वुंगजागिन वाल्टे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची आणि त्यानंतर कधीकाळी पक्षासाठी नडलेल्या, लढलेल्या आणि भिडलेल्या आमदाराला आता पक्षाचाच विसर पडल्याची बाब समोर आली आहे. (Fatal attack on sitting MLA Vungjagin Valte BJP not consider him)

मणिपूरचे भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे सध्या दिल्लीत उपचार घेत आहेत. त्यांच्यावर दंगेखोरांकडून तीन महिन्यांपूर्वी अत्यंत गंभीर आणि जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर आता स्वत: दोन मिनिटही बसू शकत नाहीत. त्यांची स्मरणशक्ती कमरोज झाली आहे. आमदार वाल्टे यांची पत्नी आणि मुलगा तीन महिन्यांनंतरही घाबरलेले आहेत. ते मणिपूरला परत जायला अद्यापही तयार नाहीत. कारण त्यांच्या मते, अजूनही वातावरण त्यांना राहण्यायोग्य नाही. तिथे गेलो तर दंगेखोर पुन्हा आपल्यावर हल्ला करतील, आपल्याला सोडणार नाही, अशी त्यांना भीती आहे.

मोठी बातमी : माजी खासदार विजय दर्डांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीसाठी वाल्टे कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी आमदार वाल्टे यांच्या पत्नी मैनु वलटे यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, त्यांचे पती भाजपचे आमदार आहेत, मात्र त्यांच्या उपचारादरम्यान पक्षातील कोणताही मोठा नेता किंवा मंत्री, मुख्यमंत्री त्यांना भेटला आले नाहीत. पक्षानेही त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली नाही. मणिपूर विधानसभेत अनेक आदिवासी आमदार आहेत, पण फक्त तिघेच जण त्यांना भेटायला आले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.

दरम्यान, आमदार वाल्टे यांचा मुलगा जोसेफ यांनी वडिलांवरील हल्ल्याचा घटनाक्रम आणि हल्ल्यातील दाहकता लोकांसमोर मांडली. ते म्हणाले, माझे वडील मुख्यमंत्री एन बिरेनसिंह यांचे जातीजमातींविषयीचे सल्लागार आहेत. 4 मे रोजी ते सचिवालयातून मुख्यमंत्र्यांना भेटून परत येत होते. तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. त्या दिवशी माझ्या वडिलांच्या डोक्यावर धारदार वस्तूंने वार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर खोलवर जखमा झाल्या होत्या. त्यांना केवळ मारहाणच नाही तर नंतर त्यांना शॉक देऊन टॉर्चर करण्यात आले. तेव्हापासून ते आता मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. आता घटनेला तीन महिने उलटून गेले आहेत, पण त्यांना दोन मिनिटेही बसता येत नाही. त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम झाला आहे. त्यांना आता बरे होण्यासाठी आणखी दोन महिने लागतील असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

Ram Shinde : 2024 फार लांब नाही, ‘मी तयारच’; राम शिंदेंनी पवारांविरोधात ठोकला शड्डू!

मणिपूरला कधी जाणार?

जोसेफच्या म्हणण्यानुसार, “सध्या आम्हाला धोका आहे, त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत त्यांचे कुटुंब इंफाळला जाणार नाही. मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल बोलताना ते म्हणाले, माझे वडील आमदार आहेत. जेव्हा तेच राज्यात सुरक्षित नव्हते तर सामान्य माणसाची काय अवस्था झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. जोसेफ यांच्या दाव्यानुसार, कट्टरपंथी मैतेई गटाचे आरामबाई टेंगगोलचा त्यांच्या वडिलांवरील हल्ल्यामागे हात होता. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आम्ही (कुकी) स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केलेले नाही, पण त्यांनी (मैतेई) आदिवासींना निघून जाण्यास सांगितले आहे. त्यांनी आम्हाला वेगळे केले आहे, अशीही खंत त्यांनी बोलून दाखविली.

वाल्टे हे कुकी समाजाचे असून ते आदिवासी आमदार आहेत.ते फिरजवल जिल्ह्यातील थानलॉन मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. मागील भाजप सरकारमध्ये वाल्टे हे मणिपूरचे डोंगरी आणि आदिवासी व्यवहार मंत्री होते. 4 मे रोजी राजधानी इंफाळमध्ये संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांची भेट घेऊन ते राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. वाल्टे यांची प्रकृती चिंताजनक पाहून त्यांना दिल्लीत आणण्यात आले. अद्याप त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. जोसेफ यांच्या दाव्यानुसार त्यांना दोन मिनिटेही बसता येत नाही. त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube