Manipur Violence : महिलांच्या व्हिडिओनंतर आता मुलांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; इंटरनेटवर बंदी…

Manipur Violence : महिलांच्या व्हिडिओनंतर आता मुलांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; इंटरनेटवर बंदी…

Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून जळत असलेल्या मणिपुरात अद्यापही दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. दोन महिलांच्या नग्न अवस्थेतील व्हायरल व्हिडिओनंतर आता मैतेई समुदायातील 2 मुलांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मणिपुरात संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर मणिपुरातच तळ ठोकून असून राज्यात पेटलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मणिपुरमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

Manipur Violence : महिलांच्या व्हिडिओनंतर आता मुलांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; इंटरनेटवर बंदी…

विविध मागण्यांसाठी मैतेई आणि नागा-कुकी समाजात अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच दोन महिलांच्या नग्न अवस्थेतील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर आता दोन मुलांच्या मृतदेहाचे फोटो समोर आल्यानंतर मैतेई समाजात मोठा भडका उडाला आहे. ज्या दोन मुलांच्या मृतदेहाचे फोटो समोर आले ते दोन जण जुलै महिन्यापासून बेपत्ता होते. सोमवारच्या दिवशी त्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल करण्यात आली आहेत.

Sanjay Raut : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? राऊतांनी सांगितलं कोण जिंकणार

फिजाम हेमजित (२०) आणि हिजाम लिनथोइनगांबी (१७) हे असं दोन मुलांचं नाव असून त्यांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होताच मणिपुरात पुन्हा एकदा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेविरोधात शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री दालनाकडे वाट धरल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाच्या जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.

गौतम अदानी अन् पवारांची भेट कशी झाली? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

या आंदोलकांना थांबवण्यासाठी सुरक्षा जवानांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला आहे. या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून या जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन मुलांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी कोणतीही अनुसूचित घटना घडवून आणू नये, असं आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

या प्रकरणावर नागरिकांनी संयम ठेवावा, या प्रकरणाची चौकशी करुन तपास केला जाणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतयं. यासंदर्भात निवदेनच मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी जारी केलं असून राज्य सरकारने हे प्रकरण तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवले आहे. ‘केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने राज्य पोलिस विद्यार्थ्यांच्या बेपत्ता होण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीमही सुरू केली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube