Manipur Violence : जनतेच्या रोषापुढं सरकारने गुढघे टेकले! महिलेची विवस्त्र धिंड काढणाऱ्या चौघांना अटक…
Manipur Violence : जगभरासह देशभरात चर्चेत असलेल्या मणिपूरच्या(Manipur) महिला विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह (Biren singh) यांनी दिली आहे. विवस्त्र महिलेची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. अखेर जनतेच्या रोषापुढं सरकारने गुडघे टेकले आहेत. विवस्त्र महिलेची धिंड काढणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री बीरेन सिंह (Biren singh यांनी स्पष्ट केलं आहे.
Manipur Viral Video Case | Three more main accused of the heinous crime of abduction and gang rape under Nongpok Sekmai PS, Thoubal District have been arrested today. So a total of four persons have been arrested till now. The State Police is making all-out efforts to arrest the…
— ANI (@ANI) July 20, 2023
दरम्यान, दोन महिलांना विवस्त्र करुन धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील जनतेकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अखेर या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिंह म्हणाले, राज्यात कुठल्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण न होण्यासाठी सरकार कटिबद्ध असून राज्यातल्या विविध समुदायांच्या प्रतिनिधींशी आमची चर्चा सुरु आहे. आम्ही शांततापूर्ण राज्यातील दोन समाजातील तेढ, गैरसमज दूर करुन भविष्यात सोबत राहणार असल्याचं सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
मृतांची संख्या वाढली! 48 कुटुंबं जमीनदोस्त, 100 जण मातीच्या ढिगाऱ्याखालीच, CM शिंदेंनी ठोकला तळ
या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनेचा निषेध करीत पोलिस प्रशासनाला आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हुईरेम हेरादास सिंह 32 याच्यासह आणखी तीन आरोपींना थाऊबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. जनसुदायाच्या आरोपानूसार व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दोन्ही महिला आदिवासी असून त्यांना धिंड काढण्याआधी त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. या आरोपींना मृत्यूदंड ठोठावण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, मणिपूरच्या कांगपोकपीमध्ये ही घटना घडली असून या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. या घटनेवर देशातील सर्वच स्तरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच राजकीय नेते, कलाकारांकडूनही घटनेचा निषेध करण्यात येत आहे. कांगपोकपीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कुठलाही अनूसुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.