असूर, मिर्झापूर बघून 8 कोटींचा दरोडा अन् दुहेरी हत्या; 3 वर्षांचा प्लॅन पोलिसांनी 36 तासात उधळला

असूर, मिर्झापूर बघून 8 कोटींचा दरोडा अन् दुहेरी हत्या; 3 वर्षांचा प्लॅन पोलिसांनी 36 तासात उधळला

नवी दिल्ली : असूर आणि मिर्झापूर या वेब सिरीज बघून दरोडा आणि दुहेरी हत्याकांड केलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. मेरठ पोलिसांनी अवघ्या दीड दिवसांत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. हे दोन्ही आरोपी जवळपास 3 वर्षांपासून दरोड्याचे प्लॅनिंग करत होते. विशेष म्हणजे यातील एक आरोपी वकिलीचे शिक्षण घेत असलेला आहे. (Police arrested two accused of robbery and double murder after watching web series ‘Asur’ and ‘Mirzapur’)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी मेरठमध्ये गोरीपुरा येथील उद्योगपती डीके जैन आणि अंजू जैन या दाम्पत्याच्या घरी धाडसी दरोडा पडला. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी घराच्या बेडरूममध्ये घुसून लाखोंचे दागिने आणि रोकड असा मिळून जवळपास 8 कोटींचा मुद्देमाल लंपास केला. घटनेदरम्यान, आरोपींनी दोघांचीही गोळ्या झाडून हत्या केली होती.

Sharad Pawar : अजित माझा पुतण्या, भेटण्यात गैर काय? गुप्त भेटीवर शरद पवारांचा सवाल

दरोडा आणि दुहेरी हत्याकांडचे हे प्रकरण उघडकीस येताच खळबळ उडाली होती. राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले होते. त्यामुळे या घटनेतील आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते. यानंतर तपासासाठी 36 पोलिसांच्या जवळपास आठ टीम बनविण्यात आल्या. तसंच 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. यानंतर मिळालेल्या पुराव्यांची एक एक साखळी जोडून पोलिसांनी अवघ्या 36 तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

3 वर्ष केले दरोड्याचे प्लॅनिंग :

2020 मधील लॉकडाऊनमध्ये मेरठ कॉलेजमधील एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या प्रियांक शर्माने असुर आणि मिर्झापूर या दोन वेब सिरीज पाहिल्या. त्यानंतर झटपट पैसे कमविण्यासाठी त्याने दरोड्याचा प्लॅन आखला. दरोड्याची ही घटना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आरोपी प्रियांकने बॅटरीच्या दुकानात काम करणाऱ्या यश शर्माला सोबत घेतले. सुमारे 3 वर्षे तो अखंडपणे लुटीच्या नियोजनावर काम करत राहिला.

या दरम्यान, प्रियांकने डीके जैन यांच्या घराजवळच असलेल्या त्याच्या मामांच्या घराचीही मदत घेतली. इथे प्रियांक वारंवार येत असे. पोलिस मोबाईलवरून लोकेशन शोधत असल्याने त्याने मोबाईल वापरला नाही. इतकंच नाही तर सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकतात, याचीही त्याला कल्पना होती, त्यामुळे ओळख लपविण्यासाठी त्याने ग्लोव्ह्ज, हेल्मेट आणि चोरीची नंबरप्लेट वापरली.

Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव’

घरातील तिजोरी कापण्यासाठी ग्राइंडर खरेदी केले. या दरोड्यादरम्यान, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्या सर्व ठिकाणांची नोंद घेण्यात आली. एवढेच नाही तर घटनेनंतर पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी ते दिवसभर शहरात फिरत राहिले आणि कॅमेरे नसलेल्या छावणी परिसरातून गायब झाले. तिथून प्रियांकने त्याच्या प्रेमपुरी येथील घरी आश्रय घेतला आणि दुसरा आरोपी यश त्याच्या रोहता रोडवरील घरी जाऊन लपला.

पोलिसांनी सांगितले की, ज्या पिस्तूलने खून केला ते आरोपीच्या मित्राचे आहे. पण काही वर्षांपूर्वी त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. पिस्तूल स्वयंचलित होते आणि प्रियांकला पिस्तूल कसे चालवायचे हे देखील माहित नव्हते. तो दरोडा टाकत असताना अंजू जैन यांनी विरोध केला, त्यामुळे त्यांनी गोळीबार केला आणि ती गोळी डीके जैन यांना लागली. यानंतर त्यांनी अंजू जैन यांच्यावरही गोळी झाडली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube