बांगलादेश हिंसाचारात आवामी लीग टार्गेट; शेख हसीना यांच्या पक्षाच्या सुमारे २९ नेत्यांचे मृतदेह सापडले

बांगलादेश हिंसाचारात आवामी लीग टार्गेट; शेख हसीना यांच्या पक्षाच्या सुमारे २९ नेत्यांचे मृतदेह सापडले

Bangladesh violence : गेल्या 15 वर्षांपासून बांगलादेशमध्ये सरकार चालवत असलेल्या शेख हसीना यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडत भारतात आश्रय घेतला. मात्र,   (Bangladesh violence)बांगलादेशमध्ये त्यांचा पक्ष अवामी लीगच्या नेत्यांच्या घरांवर हल्ले सुरूच आहेत. मंगळवारी देशातील अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या किमान 29 नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची तोडफोड आणि लुटमार आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

Mohammad Yunus: बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन, अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस नेतृत्व करणार

घरात मृतदेह सापडले

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडल्यापासून सातखीरामध्ये हल्ले आणि हिंसाचारात किमान 10 लोक ठार झाले आहेत. तर कोमिल्ला येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात 11 जण ठार झाले. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला अज्ञातांनी आग लावल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरातून मृतदेह सापडले. यामध्ये पाच तरुणांचाही समावेश आहे.

उपचार सुरू

संतप्त जमावाने या भागातील शाह आलम यांच्या तीन मजली घरावर हल्ला केला होता. आंदोलकांनी घराच्या तळमजल्यावर आग लावली. यावेळी काही लोक घराच्या तिसऱ्या मजल्यावर चढले होते. आगीचा धूर तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घरही आंदोलकांनी जाळले

नाटोर-2 (सदर आणि नळडांगा) मतदारसंघाचे खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने लावलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी खासदारांच्या ‘जन्नती पॅलेस’ या घरातील अनेक खोल्या, बाल्कनी आणि टेरेसमध्ये मृतदेह आढळून आले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्याची बातमी समजताच संतप्त आंदोलकांनी खासदार शफीकुल यांच्या घराला आग लावली. त्यांच्या लहान भावाची घराशेजारी असलेली पाच मजली इमारत आणि खासदारांचे जुने घरही आंदोलकांनी जाळले. याआधी आंदोलकांनी तिन्ही ठिकाणं लुटली.

शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा

लीगच्या नेत्यांचीही हत्या

फेणीमध्ये स्थानिक लोकांना जुबा लीगच्या दोन नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत. जुबा लीगचा नेते मुशफिकुर रहीम यांचा मृतदेह सोनागाजी उपजिल्हामधील एका पुलाखाली आढळून आला होता. मुशफिकर हे युनियन जुबा लीगचे कार्यालय सचिव होते. तर फेनी सदर उपजिल्हामध्ये सकाळी आणखी एक जुबा लीग नेते बादशाह मिया यांचा मृतदेह सापडला होता. जिल्हा एएलचे संयुक्त महासचिव सुमन खान यांच्या घराला आंदोलकांनी सोमवारी आग लावली. लाल मोनिरहाटमध्ये स्थानिक लोकांनी सुमन खान यांच्या घरातून सहा मृतदेह बाहेर काढलं. याशिवाय बोगरा येथे जमावाने जुबा लीगच्या दोन नेत्यांचीही हत्या केली. ही घटना दीरखीपारा आणि शाहजहांपूर उपजिल्हामध्ये घडली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube