अमित शहांना नाही लोकसंख्येचे टेन्शन; म्हणाले, भारताची लोकसंख्या ही..

अमित शहांना नाही लोकसंख्येचे टेन्शन; म्हणाले, भारताची लोकसंख्या ही..

Amit Shah on Population : देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत असून 130 कोटींच्याही पुढे गेली आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही. आता सररकारमधील मंत्रीच लोकसंख्या देशापुढचे आव्हान नसल्याचे म्हणत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी असेच एक वक्तव्य केले आहे असोचेमच्या वार्षिक सत्र ‘भारत @ 100’ ला संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले, ‘काही लोक 130 कोटी लोकसंख्येला ओझे मानतात पण मी 130 कोटी लोकसंख्येला मोठी बाजारपेठ मानतो. पंतप्रधान मोदींनी गेल्या नऊ वर्षांत देशाच्या विकासासाठी काम केले आहे.

Kunal Tilak चंद्रकांत पाटलांवर नाराज… म्हणाले माझ्या आईच्या कामाला दुर्लक्षित करणे बरोबर नाही!

शाह पुढे म्हणाले, ‘पीएम मोदींनी आमच्यासमोर दोन ध्येय ठेवले आहेत. 2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित देश बनवणे आणि 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे आणि त्यानुसार सरकारकडून कार्यवाही केली जात असल्याचे शहा म्हणाले.

सध्या देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. लोकसंख्या वाढत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पायाभूत सुविधा देण्यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्या हे देशावरील ओझे नाही तर ही एक मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले आहे.

सावरकर वाद! ठाकरेंची बाजू घेत शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं

देशाची मोठी लोकसंख्या पाहूनच येथे व्यापाराच्या संधी वाढल्या आहेत. जगभरातील कंपन्या व्यवसायासाठी येथे दाखल होत आहे. भारतीयांची क्रयशक्तीही वाढली आहे. त्यामुळे आज जगभरात भारत ही एक मोठी बाजारपेठ म्हणून गणली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube