प्रचार संपल्यानंतरही काँग्रेसचे टेन्शन कायम; बजरंग दलाने केली ‘ही’ मोठी घोषणा

प्रचार संपल्यानंतरही काँग्रेसचे टेन्शन कायम; बजरंग दलाने केली ‘ही’ मोठी घोषणा

Congress : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Elections) येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. काल येथील प्रचाराच्य तोफा थंडावल्या. या निवडणुकीत अनपेक्षितपणे बजरंग बलींची एन्ट्री झाली आहे. खरे तर ही एन्ट्री काँग्रेसनेच (Congress) करून दिली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे जाहीर केले होते.

हा मुद्दा भाजपाने हातोहात जोरदार प्रचार केला. हा मुद्दा अंगलट येत असल्याचे पाहून काँग्रेसने डॅमेज कंट्रोल करत राज्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिरे बांधण्याची नवी घोषणा केली. तरीही भाजपाने हा मुद्दा काही सोडला नाही. आता प्रचार थंडावल्यावर तरी काँग्रेसला हायसे वाटत असेल तर असे आजिबात नाही. कारण, आता बजरंग दलाने मोर्चा सांभाळला आहे. काँग्रेसविरोधात आज देशभरात ठिकठिकाणी हनुमान चालीसा पाठाचे आयोजन बजरंग दलाने केले आहे.

Karnataka Election : कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापूरात 4.41 कोटींच्या रोकडसह मोठा शस्त्रसाठा जप्त

बजरंग दलच नाही तर विश्व हिंदू परिषदही हनुमान चालीसा पाठ करणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या महासचिवाने सांगितले, की काँग्रेस आणि अन्य संघटन आणि कार्यकर्त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी हनुमान चालीसा पाठाची घोषणा केली आहे. काँग्रेस आतंकवादी आणि विरोध शक्तींची वकिली आणि प्रचार करण्यासाठीच उभी आहे.

कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यानंतर राजस्थान, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात काही हिंदू विरोधी नेत्यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बजरंग दलाची तुलना पीएफआयशी करणे तर्कहीन आहे. हिंदू समाज या अपमानाबद्दल काँग्रेसला लोकशाही पद्धतीने उत्तर देईल.

काँग्रेसच्या या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या प्रत्येक सभेची सुरुवात बजरंग बलीच्या घोषणांनी केली. तसेच या मुद्द्यावर सभेत जोरदार हल्लाबोल केला. या मुद्द्यावर काँग्रेसही बॅकफूटवर दिसली. त्यांचे नेते या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया देताना दिसले.

karnataka Assembly Election : बजरंग दलाच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला सवाल…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube