‘त्या’ गैरव्यवहारांसाठी PM मोदीच जबाबदार; ‘कॅग’च्या अहवालानंतर काँग्रेस आक्रमक

‘त्या’ गैरव्यवहारांसाठी PM मोदीच जबाबदार; ‘कॅग’च्या अहवालानंतर काँग्रेस आक्रमक

CAG Report : भाजपाच्या नेतृत्वतील केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांमधील गैरव्यवहार आता कॅगच्या अहवालातून (CAG Report) उघड झाले आहेत.या गैरव्यवहारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांनी शोधून काढावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे. कॅग अहवालात उघड झालेल्या गैरव्यवहारांवर मोदी काही बोलणार का असा सवाल उपस्थित करत या गैरव्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

अजितदादांनी घेतली नवाब मलिकांची भेट, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे-फडणवीसांना चालणार का?

या अहवालातून सात गैरव्यवहार समोर येत आहेत. रस्तेबांधणीसाठी जास्त खर्च केला गेला हा सांगणारी आकडेवारी वाहतूक मंत्रालयाने नाकारली आहे. द्वारका महामार्गाचे कंत्राट देतानाच बांधकाम खर्चात 12 टक्के वाचविण्यात आले आहेत. कॅग अहवालात प्रत्यक्ष खर्च जमेला धरला नसल्याने आकडे अवास्तव आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या अहवालाच्या माध्यमातून काँग्रेसने काही आरोप केले आहेत. भारतमाला प्रकल्प, द्वारका द्रुतगती महामार्ग, मंगलयान, टोल, आयुष्मान भारत, अयोध्या विकास प्रकल्प, ज्येष्ठ नागरिकांना भत्ता यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने कॅग अहवालाच्या हवाल्याने केला आहे. काँग्रेसच्या या आरोपांवर अद्याप भाजप नेत्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या अहवालाच्या निमित्ताने आता काँग्रेस आणि भाजपात नवा राजकीय वाद सुरू होणार आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपांवर आता भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘वंदे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक, 3 महिन्यांत 4 दगडफेकीच्या घटना

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube