बजरंगबलीचा वाद चिघळला ! भाजप आज कर्नाटकात करणार हनुमान चालीसा पाठ
Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली आहे. कर्नाटकात सरकार आले तर त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसच्या याच जाहीरनाम्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी बुधवारी आपल्या रॅलीची सुरुवात जय बजरंग बलीच्या घोषणांनी केली. त्यानंतर आता आज भाजप कर्नाटकात ठिकठिकाणी हनुमान चालीसा पाठ करणार आहे.
Karnataka : मल्लिकार्जुन खरगेंनंतर त्यांच्या मुलाची PM मोदींवर आक्षेपार्ह टीका
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की काँग्रेस नेते म्हणतात हनुमान चालीसाचे पठण कसे करायचे हे भाजप कार्यकर्त्यांना माहिती नाही. मी रणदीप सुरजेवाला यांना निमंत्रण देते की त्यांनीही येऊन पहावे की भाजप कार्यकर्ते कशा प्रकार हनुमान चालीसा म्हणतात.
त्या पुढे म्हणाल्या, काँग्रेसने राम मंदिराच्या विरोधात लढाई केली होती. त्यानंतर काँग्रेसने आश्वासन दिले आहे की कर्नाटक आणि छत्तीसगड राज्यात बजरंग दलावर बंदी घातली जाईल. काँग्रेसने रामालाही सोडले नाही त्यामुळे मग लोकांनीही काँग्रेसला संसदेत प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू दिला नाही.
मोदी काय म्हणाले ?
काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील होसपेट येथे आयोजित सभेत पंतप्रधान मोदी यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीलाही कुलुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी श्रीरामाला कुलुपात बंद केले आता जय बजरंगबली बोलणाऱ्यांनाबी कुलुपात बंद करण्याचा संकल्प करत आहे.
भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
मोदी पुढे म्हणाले, आज हनुमानजींच्या या पवित्र भूमीला नमन करणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे. आणि दुर्दैव पहा, मी आज येथे हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे त्याचवेळी काँग्रेस पार्टीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलुपबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधी श्रीरामाला कुलुपात बंद केले आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना कुलुपात बंद करण्याचा संकल्प केला आहे. देशाचे हे दुर्दैव आहे की काँग्रेस पार्टीला प्रभू श्रीरामापासून तकलीफ होत होती आता त्यांना जय बजरंगबली म्हणणाऱ्यांचाही त्रास होत आहे.