स्काय इज द लिमिट’ पण मी….; मोदींनी उघड केला देशाच्या विकासाचा ‘रोड मॅप’

स्काय इज द लिमिट’ पण मी….; मोदींनी उघड केला देशाच्या विकासाचा ‘रोड मॅप’

PM Narendra Modi : देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार आलं. त्यानंतर 2019 मध्येही लोकांनी पुन्हा एनडीएला बहुमत दिलं. त्यानंतर आता तिसऱ्यांदाही बहुमत मिळवू असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. आगामी काळात देशाची वाटचाल कशी राहिल. भाजप आघाडीची काय धोरणं आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. आगामी काळात नवीन किर्तीमान स्थापित करण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. आकाशाच्या मर्यादा आहेत पण मी सुद्धा खूप काहीतरी मिळवण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (The sky is the limit but I have come for much more)

पाकिस्तान भारताच्याबाबतीत आपला दृष्टीकोन बदलतो की नाही याची काळजी करण्याची आता काहीच गरज नाही. आता पाकिस्तानने आता दोन वेळच्या अन्नाची चिंता करावी. पाकिस्तानवर चर्चा करून वेळ वाया घालवण्याचं काम आता बंद केलं पाहिजे. आता भारत खूप पुढे निघून गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा विचार करून आपल्या देशाच्या विकास केला जाऊ नये. याऐवजी आपल्या नव्या पिढीवर आपण जास्त विचार केला पाहिजे, असे पीएम मोदी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. युक्रेन रशियाच्या युद्धावर मोदी यांनी मत व्यक्त केले. मी रशियाच्या अध्यक्षांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की सध्याचा काळ युद्धाचा नाही. युद्धाची सध्या गरज नाही.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चारशे पारचा नारा दिला आहे. भाजप नेते आणि स्टार प्रचारक प्रचार सभांतून ही घोषणा करत असतात. भाजपने यावेळच्या निवडणुकीत हीच घोषणा का केली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोदी म्हणाले, आ्मच्याकडे आधीच बहुमत आहे. मग आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाच्या सदस्यांना पुढे जाण्यासाठी आम्ही या घोषणेच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊ शकत नाही का, असा प्रति सवाल मोदींनी केला.

चौथ्या टप्प्यात घमासान! पाच मंत्री, एक माजी CM, दोन क्रिकेटर अन् अभिनेते मैदानात

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनावरून होणाऱ्या राजकारणावर विचारले असता मोदी म्हणाले, राम मंदिरासठी देशातील जनतेने ५०० वर्षे संघर्ष केला. आम्हाला या संघर्षाचा अभिमान आहे. हाच संघर्ष जगभरातील लोकांना प्रेरणा देऊ शकतो. राम मंदिर लोकांना एकत्रित आणण्यासही उपयुक्त ठरू शकते.

काँग्रेस संविधान बदलण्याच्या प्रयत्नात

काँग्रेस पक्षावर टीका करताना मोदी म्हणाले, मला एका काँग्रेस खासदार आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवारानं सांगितलं की काँग्रेस आता माओवादी विचारांच्या जाळ्यात फसली आहे. याचा अर्थ असा आहे की काँग्रेस पक्ष त्यांच्या मूल्यांना समजणारे पक्षातील लोक या माओवादी विचारांनी त्रस्त झाले आहेत. या गोष्टीचा विचार त्यांनी करायला हवा.

काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाद

काँग्रेसने देशाच्या संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू केले आहे. शंभरपेक्षा जास्त वेळा देशात राष्ट्रपती राजवट लावून देशालाच झटका देण्याचं काम काँग्रेसनं केलं. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीही गळचेपी केली. आता काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्ष देऊन संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या धारणेवरच पुढे जाऊ शकतो. जात, पंथ, धर्माच्या आधारे भेदभाव होऊ नये. क्षेत्रीय भेदभाव देखील होऊ नये, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने आपल्या विभाजनकारी धोरण आणि वादग्रस्त वक्तव्यांनी देशाच्या राजकारणात वाद निर्माण केला आहे.

दहा वर्षांच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार संपला का नाही असा प्रश्न मोदींना या मुलाखतीत विचारण्यात आला. मोदी म्हणाले, फक्त तेच लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढू शकतात जे भ्रष्टाचारापासून मुक्त आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत आमच्या सरकारचं झिरो टॉलरन्स धोरण आहे. आम्ही भ्रष्टाचाराला देशातून मिटवून टाकू. धोक्याचं राजकारण संपवावं लागेल.

भ्रष्टाचाऱ्यांनी लुटलेले पैसे गरीबांना परत करणार 

जेव्हापासून आमचं सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून जे लोक भ्रष्टाचावर उपदेश देण्याचं काम करत होते ते आता उघडे पडले आहेत. तपास यंत्रणांना पूर्ण मोकळीक सरकारने दिली आहे. इतकंच नाही तर या भ्रष्टाचाऱ्यांनी लुटलेला गरीबांचा पैसा त्यांना परत कसा देता येईल यासाठी आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत, असेही मोदी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube