कर्नाटकनंतर ‘या’ राज्यातही भाजपचा पाय खोलात; नाराज आमदारांनी गाठली दिल्ली

कर्नाटकनंतर ‘या’ राज्यातही भाजपचा पाय खोलात; नाराज आमदारांनी गाठली दिल्ली

Manipur : कर्नाटकात ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला (BJP) जोरदार झटका दिला. या निवडणूक राज्यात सत्ताधारी भाजपला अडचणी जाणवत असताना आता आणखी एका राज्याने भाजपचे टेन्शन वाढवले आहे.

मणिपूरमध्ये (Manipur) एन. बिरेन सिंह सरकारविरोधात भाजप आमदार नाराज झाले असून त्यांनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती मिळाली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार आमदारांचं शिष्टमंडळ वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत आले आहे. यामध्ये तब्बल 40 आमदारांचा समावेश आहे. एकाच वेळी इतके आमदार नाराज असल्याने चर्चांना उधाण आले आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे सरकारमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया…

राज्यात मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे हेनगांग मतदारसंघात त्यांचे काँग्रेस प्रतिस्पर्धी पी. शरतचंद्र सिंह यांचा 18 हजार 271 मतांनी पराभव केला होता.

60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपने 32 जागा जिंकत बहुमत मिळवले होते. जनता दल (संयुक्त) पक्षाने 6 जागा जिंकल्या. मागील निवडणुकीत भाजप सत्तेत येण्याआधी राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत फक्त 5 जागा मिळवल्या.

संख्याबळात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने 7 जागा जिंकल्या. नागा पीपल्स फ्रंट या पक्षाला 5 जागा मिळाल्या. अशा परिस्थितीत राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. आणि याच पक्षात नाराजी उफाळून आली आहे. या नाराजीला मुख्यमंत्री बिरेन सिंह हे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

दिल्लीत आलेले हे आमदार भाजप नेतृत्वाशी काय चर्चा करतात. त्यानंतर भाजप वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपचे टेन्शन वाढले

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सावदी यांच्याप्रमाणेच काँग्रेसने शेट्टार यांनाही तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube