अभिमानास्पद! तब्बल 12 तासांचं ऑपरेशन, भारतीय नौदलाने इराणी जहाजाची केली सुटका
Indian Navy : भारतीय नौदलाने प्रत्येक भारतीयाला (Indian Navy) अभिमान वाटेल असे काम पुन्हा एकदा केले आहे. भारतीय नौदलाच्या युद्धानौका आएनएस सुमेधाने शुक्रवारी सोमालियन समुद्री लुटारूंपासून अल-कंबर या इराणी जहाजातून 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली. या कामगिरीची माहिती नौदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. या जहाजावर सोमालियाचे 9 चाचे होते. येमेनमधील सोकोत्रा बेटाच्या नैऋत्येला 166 किलोमीटर अंतरावर हे जहाज होते.
Indian Navy rescues 23 Pakistani nationals from Somali pirates after a 12-hour-long operation in the Arabian Sea in which the pirates on board were forced to surrender. Indian Navy warship INS Sumedha intercepted FV Al-Kambar during the early hours of 29 Mar 24 & was joined… pic.twitter.com/54Qogor7qy
— ANI (@ANI) March 29, 2024
या जहाजाचे अपहरण होऊ शकते असा अलर्ट मिळताच भारतीय नौदल अॅक्टिव्ह झाले. नौदलाने वेगवान हालचाली करत सुमेधा यु्द्धनौकेला या जहाजाला रोखण्यासाठी रवाना केले. यानंतर दुसरी यु्द्धनौका आयएनएस त्रिशूलच्या मदतीने या समुद्री लुटारुंपासून जहाजाची मुक्तता केली. जवळपास बारा तास हे ऑपेरशन सुरू होते. जहाजावरील लुटारू टोळीने आत्मसमर्पण करण्यासाठी नौदलाने शर्थीने झुंज दिली.
India Maldives : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी, कर्मचाऱ्यांची एन्ट्री; नवा प्लॅन काय?
नौदलातील अधिकाऱ्यांनी सांगितले की मासेमारी करणारे इराणी जहाजाचे अपहरण होण्याचा इशारा आम्हाला मिळाला. यानंतर अरब समुद्रात तैनात असलेल्या दोन युद्धनौकांना या जहाजाच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले. ज्यावेळी अपहरण करण्यात आले त्यावेळी हे जहाज येमेनपासून 167 किलोमीटर अंतरावर होते. त्याचवेळी समुद्री लुटारूंनी या जहाजाचा ताबा घेतला.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अरबी समु्द्रात सोमाली लुटारुंकडून जहाज अपहरणाच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौकांची तैनाती वाढवली आहे. नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल आर. हरिकुमार यांनी सांगितले होते की हिंद समु्द्र आधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आगामी 100 दिवसांत समुद्री लुटेऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी यावेळी दिली होती.
Indian Navy Helicopter ला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्यावर कोसळले