मध्य प्रदेशात भाजप सेफ, काँग्रेस मात्र फेल; २८ वर्षांच्या राजकारणात भाजप सरस

मध्य प्रदेशात भाजप सेफ, काँग्रेस मात्र फेल; २८ वर्षांच्या राजकारणात भाजप सरस

Madhya Pradesh Lok Sabha Election : मध्य प्रदेश भाजपाचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आला आहे. 1996 पासूनचा इतिहास पाहिला तर भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे. 2009 मधील निवडणुकांचा अपवाद वगळला तर काँग्रेस या राज्यात कधीच भाजपाला टक्कर देण्याच्या स्थितीत नव्हती. 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर या राज्यात भाजपची कामगिरी शानदार अशीच राहिली आहे. 29 जागा असणाऱ्या या राज्यात भाजपने अनुक्रमे 27 आणि 28 जागा जिंकल्या होत्या.

2014 मधील निवडणुकीत गुना आणि छिंदवाडा या दोनच मतदारसंघात काँग्रेस भाजपला पराभूत करू शकली. तर 2019 मधील निवडणुकीत फक्त छिंदवाडामध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. 2014 मधील निवडणुकीत गुना मतदारसंघातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी विजय मिळवला होता.

चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या! भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा, अनेक ठिकाणी ‘टफ फाइट’

त्यानंतर 2019 मधील निवडणुकीत मोठा उलटफेर पाहण्यास मिळाला. गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांना पराभवाचा धक्का बसला पण छिंदवाडा राखण्यात काँग्रेसला यश आलं. पण आता राजकारण फिरलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आता भाजपबरोबर आहेत आणि यंदाही त्यांनी याच मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे.

इतिहासावर नजर टाकली तर अविभजित मध्य प्रदेशात आधी लोकसभेच्या 40 जागा होत्या. 2000 मध्ये छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली त्यामुळे राज्यात 29 जागा राहिल्या आहेत. मागील चार लोकसभा निवडणुकीत एकूण 20 जागा अशा आहेत जिथे विजयातील अंतर 5 ते 10 टक्क्यांच्या आसपास राहिले आहे. यापैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. दोन ते पाच टक्के अंतर असणाऱ्या जागांची संख्या 12 आहे. यातील सहा जागा काँग्रेसने तर सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या.

याच पद्धतीने मागील चार लोकसभा निवडणुकीत सहा जागा अशा होत्या जिथे उमेदवारांच्या जय पराजयातील अंतर दोन टक्क्यांपेक्षाही कमी राहिले होते. यातील चार जागा भाजपने तर दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. सन 1989 पासूनच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारी कधीही 40 टक्क्यांपेक्षा खाली गेलेली नाही. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत तर भाजपला अनुक्रमे 54 आणि 58 टक्के मते मिळाली होती.

वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..

मागील वर्षात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला प्रचंड विजय मिळाला होता. राज्य सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसला येथे मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या दोन वर्ष आधीच दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही आमदारांना सोबत घेत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. या फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकांना राग आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात मतदान होईल असा काँग्रेस नेत्यांचा होरा होता. पण तसं काहीच घडलं नाही.

विधानसभेतही भाजप सुस्साट..

230 जागांपैकी भाजपला तब्बल 163 जागा मिळाल्या तर काँग्रेसला फक्त 66 जागांवर समाधान मानावे लागले. 2018 मधील निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसचे हे प्रदर्शन अतिशय खराब राहिले. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 48 ने कमी झाल्या होत्या तर भाजपला मात्र 54 जागांचा फायदा झाला. 2003 पासून भाजप प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत आहे. यामध्ये फक्त 2018 मधील निवडणुकांचा होता. या वर्षात काँग्रेसने भाजपाचा पराभव करत सरकार स्थापन केले होते. परंतु अंतर्गत वादामुळे कसेबसे 15 महिनेच सरकार चालवता आले. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केल्याने सरकार कोसळले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज