भाषण संपताच अमित शाहांचा अॅक्शन मोड; मणिपूर शांत करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Manipur Violence : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल संसदेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. मोदी सरकारने मणिपुरात भारतमातेची हत्या केली, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अत्यंत जहरी टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना विरोधक तिथे जाऊन आगीत तेल ओतण्याचे काम करत असल्याचे शाह म्हणाले होते. त्यांनी संसदेत आक्रमक भाषण केल्यानंतर लगेचच मणिपूरबाबत एक मोठा निर्णय घेतला.
मणिपूरमध्ये हिंसाचार का होतो? गृहमंत्र्यांनी सगळा घटनाक्रमच सांगितला, कॉंग्रेसवरही जोरदार टीका
मणिपुरातील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची बुधवारी रात्री भेट घेतली. या शिष्टमंडळाला मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या तैनातीला सक्षम बनविण्याचे आश्वासन दिले. या शिवाय संवेदनशील भागात कोणत्याही कमतरतेला दूर करण्यासाठी तातडीने पाऊले उचलू असेही या शिष्टमंडळाला सांगितले.
मणिपूर का पेटलं?, शहांनी एक-एक करत सगळंच सांगितलं
अमित शाह म्हणाले,मणिपूरमध्ये 2021 मध्ये वातावरण बिघडायला सुरूवात झाली. 2021 मध्ये म्यानमारमध्ये सत्तापरिवर्तन झाले. तिथं लष्करी राजवट आली. म्हणूनच कुकी डेमोक्रेटीक संघटना लोकशाहीसाठी आंदोलन करून लागली. मात्र, लष्करी राजवटीने कुकी समाजावर दबाव आणला. त्यामुळं कुकी समाजाचे लोक भारतात येऊ लागले. हजारो कुकी मणिपूर आणि मिझोरामच्या जंगलात स्थायिक झाले. यामुळे मणिपूरच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं.
संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली
ही घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घातलं आतापर्यंत 10 किलोमीटरपर्यंत कुंपण घातले आहे. 60 किमी कुंपणाचे काम सुरू आहे. कुकी समुदाय मणिपूरच्या डोंगराळ भागात राहतो तर मेतैई लोक पठारावर राहतात. पण, म्यानमारमधून होणाऱ्या घुसखोरीमुळे तेथील मेतैई लोकांना भीती वाटू लागली. आरक्षण आणि नोकऱ्यांवर परिणाम होईल, अशी भीती त्यांना आहे. आम्ही 2023 पासून निर्वासितांची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही मेतैईमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
अफवा पसरल्या की निर्वासितांनी उभारलेली वसाहत गाव म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही अफवा राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर हायकोर्टाचा निकाल आहे. यामुळं आगीत इंधन ओतल्या गेलं. मिरवणूक निघाली. यावर दगडफेक झाली. त्यानंतर काय झालं हे सर्वांनी पाहिले, असे शाह म्हणाले.