नवा वाद उफळणार! भाषणादरम्यान राहुल गांधींकडून PM मोदींची थेट रावणाशी तुलना

नवा वाद उफळणार! भाषणादरम्यान राहुल गांधींकडून PM मोदींची थेट रावणाशी तुलना

No Confidence Motion : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना त्यांनी रामायणातील एक प्रसंग सांगितला.

Video : मणिपुरात भारतमातेची हत्या, संसदेत राहुल गांधींचा मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल

मणिपूरमध्ये भाजपच्या राजकारणाने भारताची हत्या केली आहे, त्यांनी भारताची हत्या केली आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. राहुल गांधींच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारच्यावतीने उभे राहत या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मणिपूरमध्ये सरकारने भारताचा आवाज मारला म्हणजे भारत मातेची हत्या केली असून, तुम्ही देशद्रोही आहात, मणिपूरमध्ये तुम्ही देशाचा खून केला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सरकारवर केला.

मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो, मात्र पंतप्रधान अजून गेलेले नाहीत. मणिपूर हा पंतप्रधानांसाठी भारत नाही, आज मणिपूरचे दोन भाग झाले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमधील एका महिलेने मला सांगितले की, तिच्या एकुलत्या एका मुलाला गोळी मारण्यात आली आहे, मी रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ राहिले. जेव्हा ती महिला तिच्या त्रासाची माहिती देत ​​होती तेव्हा ती बोलत असताना बेशुद्ध पडली, अशा घटना राहुल गांधींनी सांगितल्या.

Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

ते पुढे म्हणाले, रावण हा दोन जणांचे ऐकायचा एक मेघनाद आणि कुंभकर्ण. तसेच मोदीजी हे दोन जणांचे ऐकतात एक अमित शाह आणि दुसरे अदानी. त्यांच्या या वक्तव्यानंतरही सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही विरोधी सदस्यांना त्यांच्या वागणुकीबद्दल फटकारले. मात्र सभागृहातील गदारोळ काही कमी झाला नाही.

स्मृची इराणींचं गांधी कुटुंबाला थेट चॅलेंज

काँग्रेस आघाडीतील एका नेत्यानं म्हटलं होतं की भारताचा अर्थ केवळ उत्तर भारत आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या साथीदाराच्या वक्तव्याचे खंडन करावे. काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरात जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले होते. जम्मू काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणारा नेता काँग्रेसमध्ये का आहे, गांधी कुटुंबात हिंमत असेल तर त्यांनी याचे खंडन करून दाखवावे, असे आव्हान स्मृती इराणी यांनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube