9 Years of Modi Government: 9 फोटो अन् PM मोदींच्या लूकची चर्चा
PM Modi’s Popular Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. (9 Years of Modi Government) यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. यातील काही ठिकाणीचे फोटो खूपच गाजले आहेत, तर काही ठिकाणी त्यांनी केलेल्या कृतीचे कौतुक झाले. इस्त्रायलसारख्या देशाने तर त्यांच्या सन्मानार्थ फुलाचे नाव बदलून त्या फुलाला मोदींचे नाव दिले. चला तर मग त्यांच्या या काही खास फोटोची माहिती घेऊ या..
शाल : शाल ही नरेंद्र मोदींसाठी एक विशेष स्टाईल आयकॉन ठरली आहे. नरेंद्र मोदी हे नेहमीच शाल वापरताना दिसत नाही. कधीतरीच त्यांनी शाल परिधान केल्याचं दिसतं. पण जेव्हा ते शाल परिधान करतात, तेव्हा त्यांची स्टाईल ही त्यांच्या इतर फॅशनपेक्षा अधिक हटके असल्याचंही फोटोंमधून दिसून आलंय.
लॉंग कुर्त्यासह पारंपरिक टोपी : नरेंद्र मोदी यांची धार्मिकता अनेकदा चर्चेचा विषय बनते. वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, विधी, पूजा मोदींच्या हस्ते पार पडल्यात. देशभरातील विविध अध्यात्मिक स्थळांना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भेटीच्या बातम्या तर होतातच. पण या भेटीदरम्यान, नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेला पोशाखही तितकाच चर्चेत असतो. केदरनाथ यात्रेवेळी नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील स्थानिक पेहराव परिधान करण्याला प्राधान्य दिलं होतं. उत्तराखंडमधील लोकांप्रमाणेच मोदींनीही एका लॉन्ग कुर्त्यासह आणि एक पारंपरिक टोपी परिधान केली होती.
सफारी, नॉर्मल सूट आणि फॉर्मल लूक : भारतीय पोशाखच नाही, तर वेस्टर्न आऊटफिटमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास लूक आणि त्याचेही अनेक फोटो अनेकदा समोर आले आहेत. विदेश दौऱ्यादरम्यान सफारी सूट, नॉर्मल सूट, फॉरमल लूकमध्येही मोदींचे फोटो अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालंय. या लुकमध्येही नरेंद्र मोदींची स्टाईल ही दखल घेण्यासारखीच असल्याचं दिसून आलंय. हा फोटो त्याचाच दाखला देतोय…
वेगवेगळ्या संस्कृतीचा पेहराव : भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असा देश आहे. याच संस्कृतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमानही आहेच. हाच अभिमान आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या पेहरावातही दिसून येतो. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देतात, तेव्हा तेव्हा ते वेगवेगळ्या संस्कृतीचा पेहराव आणि त्या संस्कृतीची ओळख यांचे दाखले द्यायला विसरत नाहीत. महाराष्ट्राच्या या पगडीसोबत असलेला मोदींचा हा लूक तेच अधोरेखित करतोय.
फुलाला मिळालं मोदींचं नाव, अचानक गाठलं पाकिस्तान; मोदींच्या ‘त्या’ दौऱ्यांचा झाला सुपर इव्हेंट!
मोदी जॅकेट : कुर्ता पायजमा आणि नेहरु जॅकेटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपण अनेकदा पाहिलं आहे. नेहरु जॅकेटचं नावंही गेल्या काही वर्षात मोदी जॅकेट झाल्याचे किस्सेही तुम्ही ऐकले असतील. हे जॅकेट नरेंद्र मोदी यांना शोभूनही दिसतं. नेहरु जॅकेट नरेंद्र मोदी यांचं फेव्हरेट स्टाईल स्टेटमेन्ट आहे. त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी यांचा हुबेहूब पुतळा साकारला गेला होता, तेव्हा तो देखील याच खास अंदाजात साकारण्यात आलेला होता.
हातात कॅमेरा, डोक्यावर टोपी : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.
जंगल सफारी लूक : म्हैसूरमधील ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी कर्नाटकमधील निसर्गरम्य बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील वन्यजीवांची पाहणी देखील केली.
9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात हंगामा
देहू दौरा; वारकरी लूक : 14 जून 2022 रोजी देहू, पुणे येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, तुकोबांच्या मूर्तीच लोकार्पण करण्यात आले आहे.
मोदींचा पंजाबी लूक : 118 फेब्रुवारी 2022 रोजी नवी दिल्ली येथे लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधान शीख शिष्टमंडळाला भेटतात. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही शीख समाजाने देशासाठी जे योगदान दिले आहे, त्याविषयी संपूर्ण भारत कृतज्ञतेचा अनुभव करतो. महाराजा रणजीत सिंह यांचे योगदान असो, इंग्रजांच्या विरोधात लढाई असो, यांच्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होत नाही की हिंदुस्तान पूर्ण होत नाही. आजही सीमेवर दक्ष असलेल्या शीख सैनिकांच्या शौर्यापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शीख समाजाची भागीदारी आणि शीख अनिवासी भारतीयांच्या योगदानापर्यंत, शीख समाज देशाचे धाडस, साहस, देशाचे सामर्थ्य आणि देशाचे श्रम यांचा पर्याय बनला आहे.