राहुल गांधींचं भाषण खटकलं! सरकारला झोंबणाऱ्या ‘त्या’ शब्दांना लागली कात्री
Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. आता मात्र यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. राहुल गांधी यांच्या भाषणातील काही शब्दांना कात्री लावण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी भाषणात वापरलेल्या हत्या, खून, देशद्रोही अशा बारा शब्दांवर सदनाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे सगळे वादग्रस्त शब्द त्यांच्या भाषणातून हटविण्यात आले आहेत.
https://twitter.com/SevadalKL/status/1689531766280011776?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1689531766280011776%7Ctwgr%5Eae5354be73a2fbfa688dbd62e4b9c14f9c12074d%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Frahul-gandhi-lokasbha-speech-words-hatyare-deshdrohi-and-other-expunged-scj-81-3846329%2F
राहुल गांधी काल संसदेतील भाषणात म्हणाले, तुम्ही (सत्ताधारी) देशद्रोही आहात, देशप्रेमी नाही. तुम्ही मणिपुरात भारतमातेची हत्या केली. माझी एक आई इथे संसदेत बसली आहे तर माझी दुसरी आई म्हणजे भारतमाता आहे. तिची तुम्ही मणिपुरात हत्या केली. आज वास्तव हे आहे की मणिपूरमध्ये तुम्ही विभाजन केलं आहे. मणिपूरमध्ये तुम्ही केरोसीन शिंपडलं तसंच इतर राज्यांमध्येही तुम्हाला केरोसीनच शिंपडायचं आहे. त्यांच्या भाषणानंतर संसदेत चांगलाच गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही काँग्रेस आणि राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
मणिपूरमध्ये भाजपच्या राजकारणाने भारताची हत्या केली आहे, त्यांनी भारताची हत्या केली आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. राहुल गांधींच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारच्यावतीने उभे राहत या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मणिपूरमध्ये सरकारने भारताचा आवाज मारला म्हणजे भारत मातेची हत्या केली असून, तुम्ही देशद्रोही आहात, मणिपूरमध्ये तुम्ही देशाचा खून केला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सरकारवर राहुल गांधी यांनी केला होता.