राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप; बड्या नेत्यावर शरद पवारांची थेट हकालपट्टीची कारवाई

राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप; बड्या नेत्यावर शरद पवारांची थेट हकालपट्टीची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार थॉमस के थॉमस यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी केली. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा दावा करत पवार यांनी ही कारवाई केली. थॉमस हे केरळ विधानसभेतील कुट्टनाड मतदारसंघातून आमदार आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार असून पक्ष केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा भाग आहे. (Nationalist Congress Party chief Sharad Pawar removed senior party leader and MLA Thomas K Thomas from its executive committee)

काय आहे नेमके प्रकरण?

थॉमस यांनी नुकतचं  त्यांच्याच पक्षातील काही सदस्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार राज्याच्या पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनी थॉमस यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते.

Rahul Gandhi : राहुल गांधींची ‘घर वापसी’; खासदारी मिळताच सरकारी घरही मिळालं

त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या अधिकारांची पायमल्ली केल्याचा दावा करत आणि पक्षाच्या सदस्यांवर बेजबाबदारपणे आरोप करुन लोकशाही आघाडीतील पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी थॉमस यांच्यावर कारवाई केली.

राष्ट्रवादीनं नौटंकी करण्याऐवजी मनपा सत्तेतून पायउतार व्हावं; काँग्रेसचा हल्लाबोल

या पत्रात शरद पवार पुढे म्हणाले की, “खोट्या तक्रारी करण्यासाठी पक्षातील तुमच्या पदाचा गैरवापर करणे हे जनतेमध्ये चांगले संकेत देणार नाही. तुम्ही केलेल्या पक्षशिस्तीचे उल्लंघन लक्षात घेता, मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीमधून काढून टाकण्याची शिफारस करतो, असे ते म्हणाले.

काय होते आमदार थॉमस यांचे आरोप?

राष्ट्रवादीचे आमदार थॉमस यांनी सोमवारी (७ ऑगस्ट) राज्य पोलीस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी पक्षाचे काही सदस्य त्यांची हत्या करण्याचा कट रचत आहेत, अलप्पुझा येथील कुट्टानाड जागेसाठी पोटनिवडणूक व्हावी, असा उद्देश यामागे आहे. या विधानसभा मतदारसंघाचे सध्याय मी प्रतिनिधित्व करतो, असे त्यांनी म्हंटले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube