एकाच व्यक्तीच्या नावावर किती SIM? सरकारने मर्यादा ठरवली; नियम चुकला तर कनेक्शन बंद

New SIM Rules : 24 ऑगस्टपासून सिम कार्डच्या कमाल मर्यादेबाबत केंद्र सरकारचे नवे कडक नियम लागू होणार आहेत.

New SIM Rules from August 24

New SIM Rules from August 24 : तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड्स आहेत का? किंवा नवीन सिम कार्ड (SIM Card) घेण्याचा विचार करत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने मोबाईल कनेक्शन्सच्या संख्येवरील नियमांची अंमलबजावणी आता अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 ऑगस्टपासून ज्या ग्राहकांनी त्यांच्या नावावर असलेली सिम कार्ड्सची कमाल मर्यादा पूर्ण केली आहे, त्यांना टेलिकॉम कंपन्यांकडून नवीन सिम कार्ड मिळणार नाही.

सरकारच्या कामाची पोलखोल करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला बक्षीस; दाखवला घरचा रास्ता

किती सिम कार्ड्स घेता येतात?

भारतात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन्सच असू शकतात. मात्र जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांसाठी ही मर्यादा 6 मोबाईल कनेक्शन्स आहे. महत्त्वाचं म्हणजे ही मर्यादा एका कंपनीपुरती नाही. तुमच्याकडे वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांचे सिम कार्ड्स असले तरी सर्व कनेक्शन्सची संख्या एकत्रितपणे मोजली जाते.

तुकाराम मुंढेंची राजस्थानमध्ये बदली? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; तुकाराम मुंढे म्हणाले…

24 ऑगस्टपासून काय बदलणार?

आतापर्यंत एखाद्या व्यक्तीने वेगवेगळ्या कंपन्यांकडून सिम घेतले असतील, तर त्याची एकत्रित संख्या तपासण्याची प्रक्रिया अधिक कडक केली जात आहे. नवीन सिम देण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन्स आहेत, याची पडताळणी करावी लागेल. जर ग्राहकाने कमाल मर्यादा गाठली असेल, तर त्याला नवीन सिम दिले जाणार नाही.

आता सरकारला कसं कळणार तुमच्या नावावर किती सिम आहेत?

यासाठी सरकार दूरसंचार विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (DoT) आणि ‘डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म’ अर्थात DIP चा वापर करणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांकडील ग्राहकांच्या कनेक्शन्सची माहिती तपासता येणार आहे. म्हणजेच तुम्ही एक सिम एका कंपनीकडून, दुसरा सिम दुसऱ्या कंपनीकडून घेतला असला तरी तुमच्या नावावर एकूण किती सिम कनेक्शन्स आहेत, हे तपासणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्राने गुजरातच्या दारात भीक मागायची का? संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल

नवीन सिम घेताना माहिती द्यावी लागणार

नवीन कनेक्शन घेताना ग्राहकांना कस्टमर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच CAF मध्ये त्यांच्या नावावर आधीपासून असलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती द्यावी लागेल. यामध्ये इतर टेलिकॉम कंपन्यांकडील आणि इतर टेलिकॉम सर्कलमधील कनेक्शन्सचाही समावेश असेल.

फोटोच्या माध्यमातूनही होणार पडताळणी?

डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स आता डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म मध्ये फोटो-आधारित ओळख सुविधाही आणत आहे. यामुळे तुमच्या नावावर आधीच किती सिम आहेत, हे तपासताना तुमची ओळख आणि फोटोशी संबंधित माहिती पडताळली जाऊ शकते.

ऑनलाइन शिवीगाळ प्रकरण, मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल

त्यामुळे 23 ऑगस्टपासून कमाल सिम मर्यादा गाठलेल्या ग्राहकांसाठी DIP वर प्रातिनिधिक प्रतिमा उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. म्हणजे DIP वर कमाल सिम मर्यादा गाठलेल्या ग्राहकांसाठी प्रातिनिधिक प्रतिमा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याचा वापर ग्राहकाच्या कनेक्शन्सची पडताळणी करताना केला जाऊ शकतो. अशाप्रकारे नवीन कनेक्शनसाठी अर्ज आल्यानंतर ऑपरेटर या माहितीचा वापर करून ग्राहकाने मर्यादा ओलांडली आहे का, हे तपासू शकतात.

चुकून जास्त सिम कार्ड जारी झालं तर?

जर तांत्रिक कारणामुळे किंवा प्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन सक्रिय झालं, तर संबंधित समस्या दूर होईपर्यंत त्या कनेक्शनची सेवा तात्पुरती स्थगित केली जाऊ शकते. दूरसंचार कंपन्यांना त्यांची प्रक्रिया DIP शी जोडण्यासाठी आणि आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणूनच, तुमच्या नावावर सध्या किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत, हे एकदा तपासून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Pakistani Sugar : पाकिस्तानकडून साखर खरेदी? पाकिस्तानी कारखानदारांची सरकारकडे मोठी मागणी

follow us