खोटेपणाचे पोतडे, निर्लज्जपणाचा कळस; काँग्रेसच्या नऊ प्रश्नांवर भाजपाचा चढला पारा
BJP Replies On Congress Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेत येऊन आज 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर, दुसरीकडे मोदींच्या नऊ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने काँग्रेसकडून 9 प्रश्न विचारत मोदींसह भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, काँग्रेसच्या या प्रश्नांना मात्र भाजपकडून खरमरीत उत्तरं देण्यात आली आहेत.
काँग्रेसतर्फे विचारण्यात आलेल्या प्रश्नांना भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद उत्तरे दिली आहेत. ते म्हणाले, “काँग्रेसने विचारलेले 9 प्रश्न हे खोटेपणाचे पोतडे असून, हा काँग्रेसच्या निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका त्यांनी केली आहे.
कांग्रेस पार्टी के द्वारा नरेन्द्र मोदी सरकार के 9 साल पूरे होने पर शायद 9 सवाल पूछे गए हैं, लेकिन वो झूठ का बड़ा पुलिंदा है। ये कांग्रेस की बेशर्मी की पराकाष्ठा है।
– श्री @rsprasad pic.twitter.com/ybD1qBv3sq
— BJP (@BJP4India) May 26, 2023
ते म्हणाले की, “तुम्ही टीका करा, पण टीका करून देशाच्या आतील संकल्पाला कमकुवत करू नका, हा मोठा अपमान आहे… त्या लाखो सेवा कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालकांचा… का… ज्यांनी कोविडच्या काळात देश वाचवण्याचा प्रयत्न केला. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज 16 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात होत आहे. मोबाईल उत्पादनात भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. भारतात डिजिटल पेमेंटचा आकडा 10 अब्ज डॉलर आहे. आज भारत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. काँग्रेसला हे सर्व दिसत नसेल तर कोण काय करू शकेल असा प्रतिप्रश्न प्रसाद यांनी यावेळी उपस्थित केला.
झूठे वादों और जनता की दुर्दशा पर भाजपा ने खड़ी की 9 साल की इमारत!
महंगाई, नफ़रत और बेरोज़गारी – प्रधानमंत्री जी, अपनी इन नाकामियों की लीजिए ज़िम्मेदारी!#NaakamiKe9Saal pic.twitter.com/G8VFAGAN0m
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2023
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी एक पुस्तिकाही जारी करत आमच्या पक्षाने पंतप्रधान मोदींना 9 प्रश्न विचारले आहेत. या सर्वांची उत्तरे देण्यासाठी ते मौन कधी सोडतील हे आम्हाला जाणून घ्यायचे असल्याचे रमेस म्हणाले होते.
काँग्रेसकडून विचारण्यात आलेल 9 प्रश्न काय?
1. देशात महागाई आणि बेरोजगारी गगनाला का भिडत आहे? तसेच सार्वजनिक मालमत्ता तुम्ही मोदींच्या मित्रांना का विकत आहेत?
2. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाही? शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा का केला नाही?
3. LIC आणि SBI मध्ये जमा केलेले सामान्य लोकांचे पैसे अदानींच्या फायद्यासाठी का वळवले गेले? अदानीच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? याचे उत्तर पंतप्रधान का देत नाहीत?
4. चीनला जोरदार धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट का दिली?
5. मतविभाजनाचे राजकारण निवडणुकीच्या फायद्यासाठी वापरले जात आहे आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम भाजपकडून का केले जात आहे?
6. महिला, दलित, अल्पसंख्यांक यांच्यावरील अत्याचारांवर पंतप्रधान गप्प का? जात जनगणनेच्या मागणीवर पंतप्रधान गप्प का?
7. घटनात्मक आणि लोकशाही संस्था कमकुवत का होत आहेत? विरोधी पक्षनेते आणि सरकारला का टार्गेट केले जात आहे?
8. मनरेगासारखी योजना कमकुवत का केली जात आहे?
9. कोरोनामध्ये गैरव्यवस्थापनामुळे जीव गमावलेल्या 40 लाख लोकांच्या कुटुंबीयांना न्याय का मिळाला नाही? असे नऊ प्रश्न काँग्रेसकडून मोदींना विचारण्यात आले होते. या सर्वांना भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. यावर आता काँग्रेस कशाप्रकारे प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.