‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक उद्या सादर होणार? भाजपने खासदारांना व्हिप बजावला
One Nation One Election Bill : वन नेशन वन इलेक्शन विधेयक (One Nation One Election Bill) उद्या लोकसभेत सादर होणार असल्याची शक्यता आहे. भाजपकडून आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला असून उद्या मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल संसदेत हे बिल सादर करणार असल्याचं बोललं जात आहे.
विरोधात प्रचार करणाऱ्यांनाही सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणार; आमदार बापूसाहेब पठारे
मागील शुक्रवारी लोकसभेच्या कामकाजाच्या यादीत वन नेशन वन इलेक्शन विधेयकाचा समावेश करण्यात आला होता. या विधेयकाच्या प्रतीही सर्व खासदारांना वाटण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर विधेयक लोकसभेच्या सुधारित कामकाजाच्या यादीतून काढण्यात आलं होतं.
वन नेशन वन इलेक्शन संदर्भात 2 सप्टेंबर 2023 रोजी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती नेमली होती. या समितीने या विषयावर 191 दिवस काम केले आणि 14 मार्च 2024 रोजी 18,626 पानांचा अहवाल सरकारला सादर केला होता. या समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ करण्याच्या बाजूने कौल दिला होता. यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ‘वन नेशन वन इलेक्शन’ला मंजूरी देण्यात आली.
‘गुम है किसी के प्यार में’मध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, साकारणार महत्वाची भूमिका
वन नेशन वन इलेक्शनचे फायदे काय?
– निवडणूकवर होणाऱ्या खर्चात बचत होईल.
– निवडणुकीवर नाही तर विकासावर भर दिला जाईल.
– काळ्या पैशावरही नियंत्रण येईल.
– वारंवार मतदानासाठी कर्मचाऱ्यांना रजा घ्यावी लागणार नाही.
– एकाचवेळी निवडणुका घेतल्यास धोरणात्मक निर्णय घेणे सोपे होईल.
दरम्यान, भाजप ‘वन नेशन, वन इलेक्शन’ करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत असून भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात यासंदर्भात आश्वासन दिलं होते. तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ करण्याचा बाजूने आपला कौल दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ‘वन नेशन, वन इलेक्शन‘ ला मंजुरी देण्यात आली होती.