पाकिस्तानचा जळफळाट! भारताला प्रत्युत्तराची तयारी; पंतप्रधान शरीफ यांचा पाकिस्तानी सैन्याला फ्री हँड

India Strikes in Pakistan : भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) दणक्यात बदला आहे. बळकट सुरक्षा व्यवस्थेचा बाता मारणाऱ्या पाकिस्तानात घुसून भारताने एअर स्ट्राइक (Operation Sindoor) केली. पाकिस्तानच्या हद्दीत प्रत्यक्षात एकही भारतीय विमानाने प्रवेश केला नाही. भारतातूनच टार्गेट सेट करण्यात आले आणि जोरदार हल्ले करण्यात आले. हल्ले सुद्धा इतके अचूक होते की जे ठरवलं तेच घडलं. भारताच्या या स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. दोन तासांपेक्षा जास्त वेळ बैठक सुरू होती. सुरक्षेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारताने केलेल्या या कारवाईने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शरीफ यांच्याकडे हल्ल्यासाठी मोकळीक मागितली. त्यावर शरीफ यांनीही सैन्याला पूर्ण अधिकार आहे असे स्पष्ट केले.
एअर स्ट्राइकने घाबरला पाकिस्तान
आमच्या देशात कोणतेही दहशतवादी तळ नाहीत असे नेहमीचेच उत्तर पाकिस्तानने दिले आहे. पहलगाम हल्ल्याचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी आम्ही केली होती. आम्हाला शांतता हवी आहे असे नेहमीचे रडगाणे पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आता सुरू केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले की जर भारत नरमाईचे धोरण स्वीकारत असेल तर आम्ही दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत.
हल्ल्यात स्कॅल्प मिसाइलची ताकद
भारताने स्कॅल्प मिसाइलच्या मदतीने पाकिस्तानात हल्ले केले. या मिसाइलला राफेलने लाँच केले होते. या मिसाइलचा वेग Mach पॉइंट 8 आहे. मिसाइल 560 ते 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्यात सक्षम आहे. शत्रू देशाच्या रडारला गुंगारा देण्यातही मिसाइल प्रभावी आहे. ही मिसाइल किल वेब रणनितीचा हिस्सा आहे. आजमितीस भारताकडे अशा 300 पेक्षा जास्त स्कॅल्प मिसाइल आहेत. भारताने या हल्ल्यात स्टँड ऑफ हत्यारे, ड्रोन आणि दारुगोळ्यासह अन्य हत्यारांचाही वापर केला असे सांगितले जात आहे.
फक्त 25 मिनिटांत खेळ खल्लास
भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी एअर स्ट्राइक करण्यात आली. 1.30 वाजता हल्ले संपले होते. जवळपास 25 मिनिटांत 21 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत दहशवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या हल्ल्यांत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. भारताच्या या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी मसूद अजहरचे कुटुंब देखील मारले गेले. त्याच्या कुटुंबातील दहा सदस्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
PM Modi : ‘मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं…’, मोदींच्या कुंडलीत नेमकं काय लपलंय?