‘रॉ’कडून मिळाली टीप अन् सैन्याने उडवले दहशतवादी अड्डे; वाचा, ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी

‘रॉ’कडून मिळाली टीप अन् सैन्याने उडवले दहशतवादी अड्डे; वाचा, ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी

India Attack Pakistan : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला पाकिस्तानने घेतला आहे. वायूसेनेने बुधवारी (India Pakistan Tension) रात्री पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राइक केली. यात सर्व दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सल्ल्यानुसार या ऑपरेशनचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात (Operation Sindoor) आले. वायूसेनेचे फायटर जेट्सने पाकिस्तानात न जाताच तांडव केले. पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.

RAW कडून टार्गेट सिलेक्शन

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नेवी, आर्मी आणि एअर फोर्सना भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने माहिती पुरवली होती. रॉनेच या दहशतवादी अड्ड्यांचे सिलेक्शन केले होते. भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राइकमध्ये लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले. या ठिकाणांवर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या अधिकाऱ्यांचेही येणे जाणे असायचे.

भारताने फक्त ‘या’ 9 ठिकाणांनाच का टार्गेट केलं? ‘ऑपरेशन सिंदूर’चा खरा उद्देश जाणून घ्याच!

फक्त 9 ठिकाणीच का झाली कारवाई

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानात 9 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास बारा अतिरेकी ठिकाणांवर हल्ला केला. हे टार्गेट पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटरपर्यंत होते. हल्ला करण्याआधी या ठिकाणांची खात्री करण्यात आली होती. नंतर त्यांना ट्रॅक करण्यात आले आणि एअर स्ट्राइक करुन पूर्ण उद्धवस्त करण्यात आले.

याच दहशतवादी अड्ड्यांतून भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणावर केल्या जात होत्या. अतिरेक्यांची घुसखोरी येथूनच होत होती. या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रांतून अतिरेक्यांना ट्रेनिंग दिले जात होती. यातील काही अड्डे पाकव्याप्त काश्मिरात तर काही अड्डे थेट पाकिस्तानात होते. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करणे आव्हानात्मक होते पण तितकेच गरजेचेही होते. तिन्ही सैन्य दलांनी ठरवलं. राजकीय इच्छाशक्तीचीही जोड होतीच. प्लॅनिंग केलं आणि एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले.

हिज्बूल मुजाहिदीनच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला

सातवा हल्ला बरनाला कॅम्पवर होता. हा कॅम्प राजौरी जिल्ह्यासमोर एलओसीपासून फक्त दहा किलोमीटरवर आहे. आठवा हल्ला सरजाल तेहरा कलां कॅम्पवर झाला. पाकिस्तानातील पंजाबच्या नरोवाल जिल्ह्यातील सरजाल तेहरा कलांमध्येही जैश-ए-मोहम्मदचा मुख्य लाँच पॅड होता.

लेहमध्ये अडकलेल्या पर्यटकांना हॉटेल मोफत; ऑपरेशन सिंदूरनंतर हॉटेल संघटनांचा मोठा निर्णय

यानंतर नववे आणि शेवटचे टार्गेट होते पाकिस्तानच्या हद्दीतील महमूना कॅम्प. हा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर आत आहे. हा कॅम्प हिज्बूल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखला जातो. येथील एका आरोग्य केंद्रात हा कॅम्प चालवला जात होता. या केंद्राच्या माध्यमातून जम्मू भागात अतिरेकी घुसखोरी करत होते. या केंद्रात 30 अतिरेकी राहत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube