- Letsupp »
- national
देश
-
मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष
नवी दिल्ली : देशात एकीकडे एक देश एक निवडणुकीची (One Nation One Election) जोरदार चर्चा सुरू असताना आता मोदी सरकारकडून (Modi Government) याची चाचपणी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समिताच्या अध्यक्षपदी असतील. समिती सदस्यांबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. मात्र, सरकारतर्फे उचलण्यात आलेल्या या पावलावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित […]
-
Manipur Violence : मणिपुरात भडकलेली आग विझेना! दोन्ही समुदायाकडून गोळीबार; 8 जण ठार
मणिपुरात गेल्या काही दिवसांपासून पेटलेली आग अद्यापही विझलेली दिसत नाही. गुरुवारी मणिपुरधील विष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात पुन्हा कुकी आणि मैतेई समुदायातील नागरिकांमध्ये गोळीबाराची चकमक झाली. या गोळीबारात तब्बल 8 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूीवर ‘ही आपली भूमी नाही का?’ हे गीत लिहिणाऱ्या एका गीतकाराचा मृत्यू झाला […]
-
Chandrayaan 3 Moonquake: चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या ‘विक्रम’ने लावला शोध; भूकंपासारख्या..,
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भूकंपासारख्या नैसर्गिक हालचालींचा शोध चांद्रयान-3 च्या विक्रमने लावला असल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे. ही नैसर्गिक हालचाल भूकंपासारखीच आहे की नाही? याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचंही इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे. चंद्रावर लॅंड झाल्यापासून चांद्रयान-3 यशस्वीपणे विविध प्रयोग करीत आहे. Chandrayaan-3 Mission:In-situ Scientific Experiments Instrument for the Lunar Seismic Activity (ILSA) payload on […]
-
गौतम अदानींचे संबंध, भेटीगाठी अन् पुरस्कार; भाजपने फोटो शेअर करुन गांधींना विचारले सवाल
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असल्याचं दिसून येत आहे. इंडियाची आज मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतमी अदानींच्या गैरव्यवहारांची यादीच मांडली आहे. त्यावरुन आता भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली आहे. भाजपनेही ट्विट करीत गौतमी अदानींचे संबंध, भेटीगाठी आणि पुरस्कारावरुन […]
-
‘इंडिया’च्या युतीला फाटा देत बसपाचा स्वबळावर लढण्याचा नारा; मायावतींची घोषणा
देशभरात भाजपविरोधी पक्षाने वज्रमूठ बांधलेली असताना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपविरोधात असलेल्या इंडिया आघाडीत बसपा सामिल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी होणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे. इंडिया आघाडीत जागावाटपाचा रनर-अप फॉर्म्युला; ठाकरे गट, राष्ट्रवादी अन् […]
-
India Q1 GDP : भारत विकास’रथा’वर! तिमाहीतील विकासदर सर्वाधिक
India GDP : भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असल्याचे गेल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवरून समोर समोर आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या 7.8 विकासदर नोंदविण्यात आला आहे. काही रेटिंग एजन्सींना कमी विकासदराचा अंदाज लावला होता. परंतु त्यापेक्षा भारताचा विकासदर जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन… […]









