Train Accident : भीषण अपघात! नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली, 4 प्रवाशांचा मृत्यू

Train Accident : भीषण अपघात! नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली, 4 प्रवाशांचा मृत्यू

Train Accident : बिहार राज्यातून रेल्वेच्या भीषण अपघाताची (Train Accident) बातमी समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास रेल्वेचा मोठा अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे (North East Express) तब्बल सहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोनशेपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना बिहारच्या बक्सरमध्ये घडली. य अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आल्यानंतर दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह 21 डबे अचानक रुळावरून घसरले. प्रवाशांना नेमकं काय होतं काहीच न कळल्याने भयभीत झाले. अचानक डबे रुळावरुन घसरले. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त झालेल्या रेल्वेतील प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. घटनास्थळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक रॅक पाठविण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाणे शक्य होणार आहे. ही एक्सप्रेस बक्सरहून आराला चालली होती. त्यावेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बक्सरच्या रघुनाथपूर रेल्वे स्टेशनजवळ पोहोचताच हा अपघात झाला. अपघातात रेल्वेचे किती डबे रुळावरून घसरले याची खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सहा डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे.

चिनी कंपनी Vivo वर ईडीची मोठी कारवाई, कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यासह चौघांना अटक

रेल्वे मंत्र्यांचे ट्विट

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं. मदतकार्य पूर्ण झालं आहे. सर्व डब्यांची माहिती घेतली आहे. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

या घटनेनंतर रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी येथील परिस्थिती भीषण होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. रेल्वेतील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात येऊन अॅम्ब्यूलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube