प्रचाराची धामधूम शांत होताच मोदींचा पुढचा प्लॅन ठरला; कन्याकुमारीत करणार ध्यान

  • Written By: Published:
प्रचाराची धामधूम शांत होताच मोदींचा पुढचा प्लॅन ठरला; कन्याकुमारीत करणार ध्यान

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेली निवडणुकीच्या धामधुमीत मोदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी देशातील अनेक मतदारसंघ पिंजून काढले. त्यानंतर आता शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार असून, 30 मे रोजी प्रचाराच्या तोफा शांत होणार असून, त्यानंतरचा मोदींचा प्लॅन समोर आला आहे.

मोदींच्या समोर आलेल्या प्लॅननुसार 30 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला भेट देणार असून, या ठिकाणी बांधण्यात आलेल्या रॉक मेमोरियलमध्ये ध्यान धारणा करून स्वामी विवेकानंदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मोदी ध्यान मंडपममध्ये 30 मेच्या संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या ध्यान मंडपममध्ये स्वामी विवेकानंद यांना ‘भारत माते’बद्दल दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याचे मानले जाते. 2019 च्या निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ गुहेत जात ध्यान केले होते. त्यांनंतर आता ते कन्याकुमारीा जाऊन ध्यान करणार आहेत.

नव्या प्रोजेक्टसाठी सिद्धार्थ आनंद-सैफ अली खान एकत्र; चित्रपटाचं नावही ठरलं

तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानादरम्यान पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारे केदारनाथ दौरा केला होता. त्या ठिकाणी त्यांनी रुद्र गुहेमध्ये ध्यान केलं होतं. त्यांच्या त्या दौऱ्याची देखील अशाच प्रकारे चर्चा झाली होती. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. हीच परंपरा कायम ठेवत यावेळी मोदी थेट कन्याकुमारीला ध्यानाला बसणार आहेत.

पक्ष वाढवणारे 90 टक्के लोक आमच्यासोबत वर्धापन दिन आमचाच; अजितदादांचा गट सज्ज

या ध्यानमंडपाशी ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे कनेक्शन आहे. त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान शंकरांसाठी देवी पार्वतीने या ठिकाणी ध्यान केलं होतं. असं सांगितलं जातं. हे स्थळ म्हणजे भारताचे दक्षिण टोक आहे. तसेच या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी मिळते. ज्यामध्ये हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तीनही सागरांचा मिलाप होतो. हे या स्थळाचं विशेष महत्त्व आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube