पक्ष वाढवणारे 90 टक्के लोक आमच्यासोबत वर्धापन दिन आमचाच; अजितदादांचा गट सज्ज

पक्ष वाढवणारे 90 टक्के लोक आमच्यासोबत वर्धापन दिन आमचाच; अजितदादांचा गट सज्ज

Ajit Pawar Group Ready for NCP Anniversary : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (
Ajit Pawar ) यांना दिलेले असल्यामुळे 10 जून हा पक्षाचा वर्धापन दिन ( NCP Anniversary ) आम्ही थाटात साजरा करणार आहोत. कारण पक्षवाढीसाठी ज्यांची नावे घेतली त्यातले 90 टक्के लोक अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष ही खाजगी प्रॉपर्टी नाही. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांनी दिली.

प्रचाराची धामधूम शांत होताच मोदींचा पुढचा प्लॅन ठरला; कन्याकुमारीत करणार ध्यान

आजही चिन्हाबाबत न्यायालयीन लढाई सुरू असली तरी शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस नावाची पार्टी नाही तर त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी हे स्वतंत्र वेगळे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. आणि चिन्हदेखील तुतारी दिली आहे त्यामुळे ज्यादिवशी नाव आणि चिन्ह त्यांना मिळाले तो दिवस ते पुढच्या वर्षी पहिला वर्धापन दिन म्हणून साजरा करतील साजरा तो त्यांना अधिकार आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

Gabh Movi: रेड्याने जुळवली लग्नगाठ ‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर

25 वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तो उत्साहात साजरा करेल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Kalyani Nagar Accident : ऑफिससमोर अपघात होऊनही माजी आमदार जगदीश मुळीक शांतचं!

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तारीक अन्वर, पी. ए. संगमा आणि प्रफुल पटेल या राष्ट्रीय नेत्यांनी आणि राज्यस्तरावर मधुकर पिचड, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, अजितदादा पवार, सुनिल तटकरे, आर. आर. आबा पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, हसन मुश्रीफ या सर्वांनी पक्ष वाढवला. आज समोरच्या पक्षाकडे ज्या कार्याध्यक्षा आहेत. त्या स्थापनेच्या वेळी संस्थापकसुध्दा नव्हत्या. असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

पक्षवाढीसाठी ज्यांची नावे घेतली त्यातले 90 टक्के लोक अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष ही खाजगी प्रॉपर्टी नाही ही लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाकडे रितसर नोंदणी झालेली व्यवस्था असते. राजकीय पक्ष खाजगी प्रॉपर्टी असती तर दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी झाली असती. त्यामुळे वंशपरंपरेने खाजगी प्रॉपर्टी ट्रान्स्फर होते तसा राजकीय पक्ष वंशपरंपरेने ट्रान्स्फर होण्याची व्यवस्था नाही. लोकशाही प्रक्रियेत ज्याच्याकडे बहुमत असते त्यांच्याकडे पक्ष जातो त्यामुळे बहुमत हे अजितदादा पवार यांच्याकडे आहे. म्हणून आम्ही 10 जूनला वर्धापन दिन देश व राज्यस्तरावर साजरा करणार आहे असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज