‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन…
यंदाचा स्वांतत्र्य दिनासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. अशातच आता यंदाही ‘हर घर तिरंगा मोहीम’ राबवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देशवासियांना केलं आहे. या मोहीमेत देशवासियांनी सहभागी व्हावं, असं म्हणत मोदींनी ट्विट केलं आहे. यासोबतच एक फोटोही अपलोड करण्यासाठी त्यांनी लिंक दिली आहे. (pm narendra modis har ghar triranga campaign again call to participate by tweeting)
‘हर घर तिरंगा’ अभियान ने आजादी के अमृत महोत्सव में एक नई ऊर्जा भरी है। देशवासियों को इस साल इस अभियान को एक नई ऊंचाई पर ले जाना है। आइए, 13 से 15 अगस्त के बीच देश की आन-बान और शान के प्रतीक राष्ट्रीय ध्वज को फहराएं। तिरंगे के साथ https://t.co/0CtV8SCePz पर अपनी सेल्फी भी जरूर…
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणाले, “देशाचा तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचं आपल्या ध्वजाशी भावनिक नातं आहे. तिरंगा आपल्याला राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. मी तुम्हांला सर्वांना विनंती करतो की १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. तिरंग्यासह तुमचे फोटो अपलोड करा”. असं मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान, ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी https://harghartiranga.com ही लिंक दिली असून यामध्ये प्रत्येकाला तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षीदेखील हर घर तिरंगा मोहीम राबवून स्वातंत्र्य दिन साजरा केला होता.